agriculture news in marathi, Hardik Patel Will Stop Drinking Water said patidar convener | Agrowon

...तर हार्दिक पाणीही सोडून देईल; पाटीदारांचा इशारा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलन समितीचे संयोजक मनोज पनारा यांनी केली. 

अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलन समितीचे संयोजक मनोज पनारा यांनी केली. 

'हार्दिकची तब्येत ही बिघडत चालली आहे, पण गुजरात सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही. पुढील 24 तासात सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी आले नाहीत, तर हार्दिक पाणी पिणेही बंद करेल आणि एकदा पाणी पिणे बंद केल्यावर जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही तोपर्यंत तो पाणी पिणार नाही. आम्हाला व आमच्या सर्व समाजाला त्याची काळजी आहे व सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. पण सरकार या उपोषणाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत आहे.' असेही पनारा यांनी सांगितले. 

मंगळवारी (ता. 4) गांधीनगर येथे झालेल्या बैठकीत पाटीदार समाजाचे अधिकारी व सरकारच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. पण सरकार आपण चर्चा सुरू करणार असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करत आहे. सरकारने चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले, पण आता हार्दिकच्या उपोषणाच्या ठिकाणी चर्चेसाठी कोणीच का जात नाही, असा सवाल आंदोलनाच्या संयोजकांनी उपस्थित केला. हार्दिक पटेल यांनी 25 ऑगस्टला सुरू केलेल्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाटीदार समाजाला आरक्षण अशा अनेक मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले आहे.  

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...