जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
औरंगाबाद : बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी या बाजार समिती आवारात व्यवसायवृद्धी आवश्यक आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज असून रस्ते, स्वच्छता यासह व्यवसायासाठी आवश्यक सोयीसुविधा देण्यावर संचालक मंडळाने विशेष लक्ष पुरविण्याची सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. औरंगाबाद उच्चतम बाजार समितीची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २८) पार पडली. या सभेत ते बोलत होते.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची २०१६-१७ ची सर्वसाधारण सभा समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेला सभापती राधाकिसन पठाडेंसह उपसभापती भागचंद ठोंबरे यांच्यासह संचालक रघुनाथ काळे, राम शेळके, दामोदर नवपूते, गणेश दहीहंडे, अल्काबाई दहिहंडे, संगिता मदगे, शिवाजी वाघ, हरिशंकर दायमा, प्रशांत सोकीया, बाबासाहेब मुदगल, देविदास कीर्तीशाही, नारायण मते, विकास दांडगे, बाजारसमितीचे सचिव विजय शिरसाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सभेच्या सुरवातीला स्वागतानंतर बाजार समितीने पहिल्यांदाच जिल्ह्यातील आदर्श शेतकरी, आदर्श विद्यार्थी, आदर्श व्यापारी, आदर्श संचालक, आदर्श खरेदीदार, आदर्श हमाल, संशोधनाच्या दृष्टीने पावले उचलणारा शेतकरी पुत्र, आदर्श कर्मचारी यांचा हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
श्री. बागडे म्हणाले, बाजार समितीची आजवरची वाटचाल पाहता उत्पन्नाचा स्राेत व व्यवसाय वाढविणे क्रमप्राप्त आहे. दोन गोडाऊन, पेट्रोल-डिझेल पंप माध्यमातून व्यवसाय वृद्धीबरोबरच बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने व पाच रुपयांत शेतकऱ्यांना जेवण देण्याची तयारी दर्शवून विद्यमान संचालक मंडळाने आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे.
- 1 of 348
- ››