agriculture news in Marathi, harvesting rates of soybean risen in parbhani District, Maharashtra | Agrowon

सोयाबीन काढणीचे दर वाढले
माणिक रासवे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

गतवर्षीच्या तुलनेत मजुरीचा खर्च वाढला आहे. एकरी उत्पादन निम्म्यावर आले. हार्वेस्टरद्वारे स्वस्तात काढणी होत आहे. परंतु त्यासाठी काही आंतरपीक तसेच जमीन वाफसावर नसल्यामुळे मर्यादा आहेत.
- नरेश शिंदे, शेतकरी, सनपुरी, ता. परभणी.
 

परभणी : यंदा सोयाबीनची मजुरांद्वारे काढणी करून घेण्यासाठी एकरी ४००० ते ४३०० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. तर हार्वेस्टरद्वारे काढणीचे दर १८०० ते २००० रुपये प्रतिएकर आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मजुरीच्या दरामध्ये एकरी ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात ४० ते ६० टक्के घट आली आणि त्यातच काढणीचे दर वाढल्याने उत्पादक अडणीत आले आहेत. 

गेल्या सात ते आठ वर्षात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४,१९,९०९ हेक्टर आहे; परंतु यावर्षी तीन जिल्ह्यात एकूण ७ लाख ६८ हजार १७६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. यंदा सोयाबीन कापून जमा करण्यासाठी एकरी २५०० ते २७०० रुपये दर आहे. कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी लावल्यानंतर मजुरांचे काम संपते.

त्यानंतर अन्य मजुरांकडून मळणी यंत्राद्वारे काढणी करावी लागते. यंदा मळणीसाठी प्रतिबॅग १२५ रुपये दर आहे. मळणीसाठी एकरी १२०० ते १५०० रुपये खर्च येतो. यंदा जुलै आॅगस्ट महिन्यात आलेल्या दीर्घ पावसामुळे सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये मोठी घट आली आहे. एकरी ३ ते ५ क्विंटलपर्यंत उतारा येत आहे.

यंदा पेरणीपूर्व मशागत ते काढणीपर्यंतच्या खर्चाची गोळाबेरीज केली असता एकरी १० हजार रुपये ते ११ हजार रुपये खर्च येत आहे. ओलावाच्या प्रमाणानुसार सोयाबीनला २००० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळत आहेत. गतवर्षी मजुरीचे दर एकरी ३३०० ते ३६०० रुपयांपर्यंत होते. तर सोयाबीनचा एकरी उतारा ८ ते १२ क्विंटलपर्यंत आला होता.

सलग पीक असलेल्या सोयाबीनची काढणी हार्वेस्टरने करता येते. परंतु सोयाबीनमध्ये तूर आंतरपीक असलेल्या पिकाची काढणी करता येत नाही. 

प्रतिक्रिया 
चार वर्षापासून हार्वेस्टरचा व्यवसाय आहे. यंदा आजवर वाफसा झालेल्या जमिनीवरील २०० एकर सोयाबीनची काढणी हार्वेस्टरने केली असून त्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी १८०० ते २००० रुपये भाडे घेतले जात आहे.
- सुरेश नावडे, हार्वेस्टर मालक, ताडलिमला, ता. पूर्णा

इतर बातम्या
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
पुणे जिल्ह्यात रब्बीत अवघे २५ टक्के...पुणे : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुणे जिल्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
सरपंचांनी कारकीर्दचे स्मरण होईल असे काम...कोल्हापूर : सरपंचांनी नैतिकता जपत निरपेक्ष व...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
बियाणे कंपन्यांत पाकिटावरील...नागपूर : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या...
टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारयवतमाळ : पॉवरग्रीड कंपनीच्या वतीने महागाव, पुसद...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटनमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा...
मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे...अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...