हतनूर प्रकल्पाच्या दोन दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग

भुसावळ, जि. जळगाव ः हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने त्यातून पाण्याचा वेगाने विसर्ग होत आहे. या पाण्याचा शेतीशिवाराला लाभ होणार आहे.
भुसावळ, जि. जळगाव ः हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने त्यातून पाण्याचा वेगाने विसर्ग होत आहे. या पाण्याचा शेतीशिवाराला लाभ होणार आहे.

जळगाव ः जिल्ह्यात हतनूर प्रकल्पाचे चार दरवाजे मंगळवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत उघडले होते. यातील दोन दरवाजे मंगळवारी रात्री बंद करण्यात आले. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस नाही. तसेच हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रातही पाऊस नाही. पण त्यात मध्य प्रदेशातून काही प्रमाणात पाणी येत आहे. मात्र, प्रकल्पात जादा साठा होऊ नये यासाठी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात अाले अाहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागांतर्गत कार्यरत गिरणा भवनातून मिळाली.

गिरणा, वाघूरमध्ये जलसाठा वाढला गिरणा प्रकल्पात पाणीसाठा वाढत अाहे. तो बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंत ६२.४५ टक्के एवढा होता. तर वाघूर प्रकल्पातील साठाही मागील आठवड्यात वाढायला सुरवात झाली अाहे. तो ६५.०८ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. तर हतनूर प्रकल्पात बुधवारी सकाळपर्यंत ८५.८८ टक्के एवढा जलसाठा होता. हतनूर प्रकल्पातून काही प्रमाणात पाणी उजव्या कालव्यातही सोडले जात आहे. ते चोपडापर्यंत पोचल्याची माहिती मिळाली.

पाचोरा, चाळीसगाव, एरंडोलातील प्रकल्प कोरडेच जिल्ह्यात पाचोरा, एरंडोल व चाळीसगाव परिसरातील मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. बहुळा, बोरी, भोकरबारी, मन्याडमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे; तर सातपुड्यातलगचे मोर, सुकी, मंगरूळ, अभोरा या प्रकल्पांमध्ये मात्र साठा हळूहळू वाढत असल्याची माहिती मिळाली. विविध प्रकल्पांमधील पाणी साठ्याची टक्केवारी हतनूर ८५.८८, गिरणा ६२.५४, वाघूर ६५.०८, अभोरा ६७, मंगरूळ १००, मोर ५०, सुकी ७६, भोकरबारी ०, मन्याड ०, अग्नावती ०, बहुळा ०, बोरी ०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com