मार्च महिन्यात उष्ण अन् थंड दिवस, पावसाची हजेरी

नकाशा
नकाशा

पुणे : तापमानात वाढ झाल्याने आलेली उष्णतेची लाट, दिवस रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्याने रात्री थंडी तर दिवसा चटका, ढगाळ हवामानासह पावसाने लावलेली हजेरी, आणि तापमानात अचानक घट झाल्याने थंड दिवस असे वेगाने होणारे बदल हे मार्च महिन्यातील हवामानाचे वैशिष्ट्य ठरले. कोकणातील भिरा येथे २६ मार्च रोजी यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद देशासह जगभरात दखलपात्र ठरली. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकला होता. दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात पुन्हा घट झाली. ११ मार्च रोजी यवतमाळ येथे यंदाच्या हंगामातील दिवसाच्या सर्वांत कमी तापमानाची (२७.५ अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली. त्यानंतर राज्यात झालेल्या ढगाळ हवामान आणि पावसामुळे रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. दि. २३ मार्च रोजी पुणे येथे यंदाच्या हंगामातील रात्रीच्या नीचांकी (१२.४) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

अवकाळी पावसाची हजेरी उन्हाची ताप वाढत असताना राज्यात १२ मार्च रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असतानाच राज्यात हवेचे दाब कमी झाल्यानंतर बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान तयार झाले. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात १२ ते १७ मार्च या कालावधीत वादळी पावसाने हलक्या ते मध्यम सरींसह हजेरी लावली.

दिवस-रात्रीच्या तापमानात तफावत राज्याच्या दिवसाच्या तापमानात वाढ होत असतानाच ढगाळ वातावरण आणि वेगवान वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. यामुळे तापमानातील तफावत वाढली होती. बऱ्याच ठिकाणी ही तफावत १५ ते २० अंशांपर्यंत होती. रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा उन्हाचा चटका असे परस्पर विरोधी हवामान अनुभवायला मिळाले. तापमानातील ही तफावत महिन्यातील अनेक दिवस कायम होती. उष्णतेची लाट आणि थंड दिवसही

महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात भिरा, मुंबईसह कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली. तर विदर्भ मराठवाड्यात तापमान वाढल्याने उन्हाचा चटका अधिक असल्याचे दिसून आले. महिन्याच्या मध्यात राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानही सरासरीपेक्षा मोठी घट होत थंड दिवसाची स्थिती होती. ११ मार्च रोजी विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला येथे तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे १५ मार्च हा थंड दिवस ठरला. मार्च महिन्यात राज्यातील विविध ठिकाणचे उच्चांकी तापमान  (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात तारीख 

पुणे     ३८.७ (२७) नगर     ४१.५ (२७) जळगाव     ४१.८ (२९) कोल्हापूर     ३७.३ (२५,३०) महाबळेश्वर     ३३.६ (२६) मालेगाव     ४२.० (३०) नाशिक     ३९.० (३०) सांगली     ३९.२ (२६) सातारा     ३९.१ (२७) सोलापूर     ४१.६ (२९) मुंबई (सांताक्रूझ)     ४१.० (२५) अलिबाग     ३७.५ (१४) रत्नागिरी     ३५.९ (२५) डहाणू     ३५.१ (२५) भिरा      ४५.०(२६) आैरंगाबाद     ३९.६ (३०) परभणी     ४२.६ (३०) नांदेड     ४२.० (२९,३०,३१) अकोला     ४२.५ (२९,३०,३१) अमरावती     ४१.६ (३१) बुलडाणा     ३९.६ (३०,२७) चंद्रपूर     ४२.८ (३१) गोंदिया     ४०.५ (३१) नागपूर     ४१.६ (३१) वर्धा     ४२.५ (३१) यवतमाळ     ४२.० (३०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com