agriculture news in marathi, heat in creased in solapur, chandrapur, akola, wardha, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा ‘पस्तिशी’पार गेला आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अकोला आणि वर्धा चांगलेच तापले आहेत. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवारी (ता. १५) दुपारनंतर वाशीम जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. 

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा ‘पस्तिशी’पार गेला आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अकोला आणि वर्धा चांगलेच तापले आहेत. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवारी (ता. १५) दुपारनंतर वाशीम जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. 

राज्यात सप्टेंबर महिन्यात १५ दिवस राज्याच्या बहुतांशी भागात कोरडे हवामान आहे. पुढील आठवड्यात (२२ सप्टेंबर) रोजी सूर्याचे दक्षिणायण सुरू होणार असून, सध्या स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३१ ते ३६ अंशांच्या जवळपास स्थिरावले आहे. मालेगाव, परभणी, अमरावती, नागपूर आणि यवतमाळ या ठिकाणी तापमान ३३ अंशांच्या पुढे आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान सरासरीच्या वर असल्याने उकाडाही वाढला आहे. यातच अनेक भागात पहाटेच्या वेळी धुक्याचे सम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. 

हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मंगळवारी (ता. १८) बंगालच्या उपसागरात कमी दाबचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या कमी दाबक्षेत्रामुळे पूर्व किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थान आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, या भागातून मॉन्सून परतण्यास पोषक स्थिती आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.२, जळगाव ३१.५, कोल्हापूर ३१.३, महाबळेश्‍वर २२.७, मालेगाव ३३.०, नाशिक २९.२, सांगली ३२.४, सातारा ३१.३, सोलापूर ३५.६, मुंबई ३०.२, अलिबाग ३२.२, रत्नागिरी ३०.८, डहाणू ३०.६, आैरंगाबाद ३१.८, परभणी ३३.३, नांदेड ३२.०, अकोला ३५.५, अमरावती ३३.४, बुलडाणा २९.२, चंद्रपूर ३५.६, गोंदिया ३२.७, नागपूर ३४.२, वर्धा ३५.०, यवतमाळ ३३.०.

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...