agriculture news in Marathi, heat increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव अक्षरश: भाजून निघाले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापुरात पारा ३७.६ अंशांवर पोचला होता, तर नगर, मालेगाव, अकोला, अमरावतीमध्येही तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने ऊन असह्य झाले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव अक्षरश: भाजून निघाले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापुरात पारा ३७.६ अंशांवर पोचला होता, तर नगर, मालेगाव, अकोला, अमरावतीमध्येही तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने ऊन असह्य झाले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पावसाने दडी मारल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासूनच उन्हाची ताप वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातही तापमानाची चढती कमान सुरू आहे. शुक्रवारी (ता. १२) जळगाव येथे तापमान ३८ अंशांवर पोचले. गेल्या दहा वर्षांच्या आॅक्टोबरमध्ये तिसऱ्यांदा जळगावमध्ये तापमान ३८ अंशांवर गेले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १० अाणि १५ ऑक्टोबर रोजी ३८ अंश तापमानाची नोंद झाली होती. तर १४ ऑक्टोबर १९८२ रोजी सर्वकालीन उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. शुक्रवारी सोलापूरामध्ये दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्याचे उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

 बंगालच्या उपसागरामधील ‘तितली’ चक्रीवादळाची जमीनीवर आल्यानंतर निवळू लागले अाहे. ओडिशा परिसरावर तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, ते पश्‍चिम बंगालकडे सरकत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे शुक्रवारी दुपारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान होते. तर अरबी समुद्रातील ‘लुबन’ अतितीव्र चक्रीवादळ पश्‍चिमेकडे सरकत आहे. रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत हे वादळ रियान (येमेन) आणि अल-घैदाह (आेमान) जवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता.१२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६, नगर ३६.६, जळगाव ३८.०, कोल्हापूर ३३.९, महाबळेश्वर २८.६, मालेगाव ३६.४, नाशिक ३४.०, सातारा ३३.६, सोलापूर ३७.६, मुंबई ३३.८, अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३३.६, आैरंगाबाद ३५.४, परभणी ३६.४, नांदेड ३५.०, अकोला ३६.६, अमरावती ३६.६, बुलडाणा ३४.६, ब्रह्मपुरी ३२.९, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३२.७, नागपूर ३३.०, वर्धा ३३.९, यवतमाळ ३४.५.

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...