agriculture news in Marathi, heat increased in state, Maharashtra | Agrowon

उन्हाची काहिली वाढली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची काहिली चांगलीच वाढली आहे. परभणी येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर तापमान चाळीशीपार गेल्याने बीड, वर्धा, अमरावतीही तापले आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, उद्या (ता. २०) विदर्भात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची काहिली चांगलीच वाढली आहे. परभणी येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर तापमान चाळीशीपार गेल्याने बीड, वर्धा, अमरावतीही तापले आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, उद्या (ता. २०) विदर्भात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे विदर्भासह मध्य भारतात ढगाळ हवामान होत आहे. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने शिडकावा केला. नागपूर येथे २.५ मिलिमीटर तर गोंदिया येथे ५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे नागपूर येथील विभागीय हवामान केंद्रातर्फे सांगण्यात आले. उद्यापासून (ता. २०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, कोकण वगळता जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले आहे. परभणी येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापूर, नांदेड, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. दोन दिवस राज्यातील तापमानाचा पारा चढाच राहणार असून, मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान चाळीशीपार राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

सोमवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१ (०.८), जळगाव ३७.६ (-०.९), कोल्हापूर ३७.१ (१.०), महाबळेश्वर ३२.२ (१.१), मालेगाव ३९.० (१.२), नाशिक ३४.६, सांगली ३८.७ (१.४), सातारा ३६.८ (०.९), सोलापूर ३९.३ (१.०), अलिबाग २९.७ (-१.१), डहाणू ३०.९ (-०.५), सांताक्रूझ ३१.६ (-१.३), रत्नागिरी ३२.० (०.३), औरंगाबाद ३५.६ (-०.८), बीड ४०.०, नांदेड ३९.४ (१.७), परभणी ४१.२ (३.४), अकोला ३९.९ (१.१), अमरावती ४०.२ (३.१), बुलडाणा ३८.३ (१.६), बह्मपुरी ३८.३ (१.१), चंद्रपूर ३९.० (०.८), गडचिरोली ३७.०, गोंदिया ३५.७ (-१.०), नागपूर ३८.४ (१.३), वर्धा ४०.० (३.१), वाशिम ३७.०, यवतमाळ ३८.५ (१.८). 
 

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...