agriculture news in Marathi, Heat increased in State, Maharashtra | Agrowon

काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान ४१ अंशांपार गेले आहे. राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान ४१ अंशांपार गेले आहे. राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यासह देशभरात उन्हाचा चटका वाढत असून, राजस्थानातील फालोदी येथे देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात हलके ढग जमा होत असले तरी, उन्हाचा तापही वाढल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी आणि मराठवाड्यातील परभणी येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारही देण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६ (०.६), जळगाव ४१.५ (-०.४), कोल्हापूर ३८.० (०.७), महाबळेश्वर ३४.० (१.९), मालेगाव ४१.८ (१.५), नाशिक ३८.२ (०.०), सांगली ४०.० (१.२), सातारा ३८.७ (१.५), सोलापूर ४१.६(१.२), अलिबाग ३१.४ (-०.५), डहाणू ३४.३ (१.३), सांताक्रूझ ३४.१ (१.१), रत्नागिरी ३५.१ (३.५), औरंगाबाद ३९.८ (०.७), परभणी ४२.१ (१.०), उस्मानाबाद ४१.१ (२.०), अकोला ४२.४ (०.९), अमरावती ४२.० (०.५), बुलडाणा ४०.५ (२.६), बह्मपुरी ४२.३ (१.३), चंद्रपूर ४१.२ (-१.०), गोंदिया ३९.८ (-१.२), नागपूर ४१.४ (०.३), वर्धा ४१.० (-०.५), यवतमाळ ४१.०(०.१).

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...