उष्णतेत तग धरणारे केळीचे वाण विकसित
चंद्रकांत जाधव
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

बीआरएस २०१३ हा केळीचा वाण अधिक उष्णतेत तग धरतो. उत्पादनही दर्जेदार व निर्यातक्षम आहे. या वाणाची लागवड अधिक तापमान असणाऱ्या विभागात शक्य असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.
- प्रा. नाझीमोद्दीन शेख, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव

जळगाव : येथील केळी संशोधन केंद्राने उष्णता आणि वेगाने वहाणाऱ्या वाऱ्यामध्ये तग धरणारा बुटक्‍या प्रकारचा बीआरएस २०१३ हा केळीचा वाण विकसित केला आहे. याची उंची बसराई जातीच्या केळी वाणापेक्षा कमी आहे. या वाणाच्या धुळे, राहुरी आणि पुणे येथील संशोधन केंद्रांवर चाचण्या सुरू आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत येथील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या चार वर्षांच्या संशोधनातून बीआरएस २०१३ हा वाण विकसित झाला आहे. इतर संस्थांनी या वाणाचे अनुकरण करून (कॉपी) त्यावर हक्क सांगायला नको यासाठी या वाणाची डीएनए तपासणी आणि फिंगरप्रींट ही प्रक्रिया केळी संशोधन केंद्राने सुरू केली आहे. राहुरी, पुणे आणि धुळे येथील कृषी संशोधन केंद्रांकडून चाचण्यांचे निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर हा वाण पुढील वर्षी प्रसारित होण्याची शक्यता आहे.

प्रक्षेत्रावरील चाचण्यांचे निष्कर्ष चांगले
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात अनेकदा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. मार्च ते जून या काळात उष्ण वारे, तापमानामुळे केळीचे घड सटकणे, झाडे अर्ध्यातून मोडणे असे प्रकार होतात. काहीवेळा मे व जूनमध्ये येणाऱ्या वादळांमध्ये केळी बागा जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान होत असते. या समस्या लक्षात घेऊन बीआरएस २०१३ हा नवा वाण विकसित केला आहे.

निमखेडी (जि. जळगाव) येथील केळी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमधून चांगले निष्कर्ष प्राप्त झाले असून, हा वाण अधिक तापमान व वेगाच्या वाऱ्यात तग धरणारा असल्याचे सिद्ध झाल्याचे केळी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. नाझीमोद्दीन शेख यांनी सांगितले.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • ग्रॅण्डनेन वाणांमधून निवड पद्धतीने विकसित
  • बुटक्‍या प्रकारचा वाण, झाडाची उंची कमाल १५८ सेंटिमीटर, घडाचे वजन सरासरी २२ किलो
  • साडेसात महिन्यांत निसवतो. केळीचा घेर १२ सेंटिमीटर, एका केळीची लांबी २१.५ सेंटिमीटर
  • करपा रोगास सहनशील, उष्ण व वेगवान वाऱ्यात तग धरतो.
  • वाऱ्यात पडझडीचे प्रमाण एक हजार झाडांमागे सात ते आठ झाडे
  • एका घडाला दहा फण्या ठेवल्या जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यास मान्यता दिली आहे

 

 

 

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...