agriculture news in Marathi, heat in state, Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका; उकाडा नकोसा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

पुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या काही भागांत सातत्याने उष्ण लाट आहे. उन्हाचा वाढलेला चटका आणि उकाडा अक्षरश: नकोसा होत आहे. दिवसभर असलेला उकाडा रात्री देखील कायम राहत आहे. यातच पूर्वमोसमीच्या सरी न बरसल्याने यंदाचा उन्हाचा अधिकच तापदायक ठरत आहे. 

पुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या काही भागांत सातत्याने उष्ण लाट आहे. उन्हाचा वाढलेला चटका आणि उकाडा अक्षरश: नकोसा होत आहे. दिवसभर असलेला उकाडा रात्री देखील कायम राहत आहे. यातच पूर्वमोसमीच्या सरी न बरसल्याने यंदाचा उन्हाचा अधिकच तापदायक ठरत आहे. 

राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमान ४० ते ४६ अंशांदरम्यान असल्याने उष्ण लाट आली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिकच वाढत असल्याने वाऱ्याची झुळकही गरम भासत आहे. काही दिवसांपासून सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा ताप वाढत असून, सायंकाळी सहा वाजल्यानंतरही उन्हाच्या झळा कायम असल्याचे अनुभवायला येत आहे. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 
विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे आहे. यात बह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. तर मराठवाड्यातील परभणी येथे ४४.८ अंश, नांदेड ४४.२ अंश तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ४३.२, जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर गुरुवारपर्यंत विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

रविवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४ (२.२), जळगाव ४३.० (०.७), कोल्हापूर ३८.० (३.१), महाबळेश्वर ३३.२ (३.८), मालेगाव ४१.२ (१.२), नाशिक ३७.९ (०.५), सांगली ४०.० (३.२), सातारा ४०.४ (५.२), सोलापूर ४३.२(३.३), अलिबाग ३१.३ (-१.९), डहाणू ३४.६ (०.२), सांताक्रूझ ३४.४ (०.९), रत्नागिरी ३५.२ (२.३), औरंगाबाद ४०.८ (१.६), नांदेड ४४.२ (२.७), परभणी ४४.८ (३.०), अकोला ४३.८ (१.९), अमरावती ४३.६ (१.६), बुलडाणा ४१.३ (३.४), बह्मपुरी ४५.९ (३.३), चंद्रपूर ४६.८ (३.६), गोंदिया ४५.० (२.३), नागपूर ४६.३ (३.५), वाशीम ४३.४, वर्धा ४५.५ (२.८), यवतमाळ ४४.५(२.८). 

मॉन्सूनची बुधवारपर्यंत प्रगती शक्य
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली. बुधवारपर्यंत (ता. २९) मॉन्सूनची आणखी काही भागात प्रगती होण्याची शक्यता आहे. यंदा केरळमध्येही मॉन्सून ६ जूननंतर दाखल होण्याचे संकेत आहेत. तर हिंद महासागरात ढगांची गर्दी होऊ लागली आहे. 

इतर बातम्या
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
नाशिक जिल्ह्यात भात लागवडीपूर्व कामे...नाशिक  : जिल्ह्यात भात उत्पादन घेणाऱ्या अनेक...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत...परभणी : जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...