agriculture news in Marathi, Heat wave increased in state, Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

पुणे ः राज्यातील काही भागांत असलेले ढगाळ हवामान निवळून गेले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे असून, काही भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भात अजूनही लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. रविवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे ः राज्यातील काही भागांत असलेले ढगाळ हवामान निवळून गेले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे असून, काही भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भात अजूनही लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. रविवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

बिहार आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर दक्षिण छत्तीसगड या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच तेलंगणा व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

आसामच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या भागात हवामान ढगाळ राहणार असून, काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रावर असलेले ढगाळ हवामान निवळून गेले आहे. मात्र, आज विदर्भाच्या काही भागात हवामान अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे काही प्रमाणात उष्णतेत वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होईल.   

पूर्व विदर्भात कोरडे हवामान असल्याने अजूनही उष्णतेची लाट आहे. यामुळे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला येथे चांगलाच उन्हाचा चटका होता. बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया या भागात उन्हाची तीव्रता कमी होती. मराठवाड्यात उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ३३ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. कोकणातील तापमान सरासरीएवढे होते.    

रविवार (ता. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३८.९ (१.४), जळगाव ४१.० (-१.७), कोल्हापूर ३७.७ (१.५), महाबळेश्‍वर ३३.१ (२.२), मालेगाव ४२.४ (१.६), नाशिक ३७.५ (-०.८), सांगली ३९.३ (१.८), सातारा ३९.१ (२.५), सोलापूर ४१.६ (०.९), मुंबई ३२.६ (-०.९), अलिबाग ३१.७ (-०.३), रत्नागिरी ३४.० (१.२), डहाणू ३३.८ (-०.३), औरंगाबाद ३९.६ (-०.२), बीड ४०.१ (-०.३), नांदेड ४२.० (०.१), परभणी ४२.३ (०.३), अकोला ४२.४ (०.२), अमरावती ४२.४, बुलडाणा ३९.६ (१.२) ब्रह्मपुरी ४५.० (३.३), चंद्रपूर ४५.२ (२.६), गोंदिया ४१.० (-०.७), नागपूर ४३.६ (१.४), वर्धा ४४.५ (१.८), वाशीम ३९.८, यवतमाळ ४१.८ (०.१).

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...