agriculture news in Marathi, heat wave possibilities in central Maharashtra, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असून, विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. १) तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत (ता. २९) उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असून, विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. १) तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत (ता. २९) उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये तापमानाच्या पाऱ्याचे चांगलीच उसळी घेतली आहे. शनिवारी सकाळपर्यंत राजस्थानमधील चुरू येथे देशभरातील उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. 

राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्रात तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश, मराठवाड्यात १ ते २ अंश आणि विदर्भात २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळपासून वाढलेल्या उन्हामुळे बाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक वाढत आहे. वापरासाठी साठवून ठेवलेले पाणी गरम होत असल्याचे दिसून येत आहे. धरणांसह लहान मोठ्या जलसाठ्यातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही वाढला असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे.  

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.२, नगर ४३.९, जळगाव ४३.५, कोल्हापूर ३९.६, महाबळेश्वर ३४.६, मालेगाव ४४.८, नाशिक ४०.५, सांगली ४०.८, सातारा ४०.१, सोलापूर ४१.४, मुंबई (सांतक्रूझ) ३३.०, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३२.०, औरंगाबाद ४०.४, परभणी ४३.२, नांदेड ४३.३, अकोला ४४.२, अमरावती ४२.६, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४२.२, नागपूर ४४.१, वर्धा ४४.२, यवतमाळ ४३.५.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...