agriculture news in marathi, heat wave in varhad, maharashtra | Agrowon

दीड महिन्यापासून वऱ्हाडात तप्त उन्हाच्या झळा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018
वाढलेल्या तापमानापासून दिलासा मिळण्यासाठी शेतकरी पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा करीत अाहेत. पाऊस जोरदार अाल्यास तापमान कमी होऊन फळबागांना फायदा होईल. शिवाय खरीप पूर्व मशागतीची कामेही वेग घेतील. केळी पिकावर खूप मोठा परिणाम झाला असून पाने फाटली. केळीचा खोडवा खराब झाला आहे. असेच उन्ह तापले तर पुढील हंगामात जून, जुलैत लागवड करायची की नाही याचा विचार करावा लागेल. 
-जगदेवराव अाखाडे, शेतकरी, डोणगाव जि. बुलडाणा.
अकोला  ः  वऱ्हाडातील तीन ही जिल्ह्यांना गेल्या दीड महिन्यापासून तप्त उन्हाचा जोरदार तडाखा बसला अाहे. याची झळ उन्हाळी पीक उत्पादनालाही बसत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघू शकलेला नाही.
 
वऱ्हाडात १५ एप्रिलपासून उन्हाच्या झळा वाढायला सुरवात झाली. दिवसाचे सरासरी तापमान हे ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत राहत अाहे. चालू अाठवड्यात तर तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान राहत अाहे. वाढत्या उन्हामुळे संत्रा, केळी, लिंबू या फळबागांना फटका बसला आहे. सोबतच उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकेही या उन्हाची झळ सहन करू शकलेली नाहीत.
 
भुईमूगासारखे हक्काचे पीक यावर्षी अनेकांना उत्पादन खर्चही देण्यापुरते अालेले नाही.  या पिकाची वाढ होऊनही झाडांना शेंगा लागल्या नव्हत्या. केळी बागांमध्ये अनेक ठिकाणी झाडे वाळली. पानांवर करपा दिसून अाला. घडसुद्धा काही ठिकाणी हे तीव्र उन्हाचा तडाखा सहन करू शकले नाही. 
 
उन्हामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली तर दुसरीकडे पाणी पुरेसे नसल्याने पिकांची तहान भागवताना शेतकऱ्यांची मोठी अोढाताण होत अाहे. प्रामुख्याने केळीसारख्या पिकाला पाणी देताना इतर पिकांकडे दुर्लक्ष करावे लागते अाहे. पाणी कमी झाल्याने व वाढलेले तापमान लक्षात घेता शेतकरी या हंगामात केळी लागवड कमी प्रमाणात करतील असा अंदाज व्यक्त होत अाहे.
 
भाजीपालावर्गीय पिकांना तर दररोज पाणी द्यावे लागत अाहे. दिवसाच्या तापमानात पाणी देणे पिकासाठी पोषक नसल्याने तसेच भारनियमन होत असल्याने अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत अाहेत.   

वऱ्हाडात बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत कापसाचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुके व अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात प्री-मॉन्सून कपाशी लागवड केली जाते. सध्याच्या तापमानामुळे अद्याप शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. सिंचनासाठी पाणी नसल्याचे दुसरे कारणही यामागे अाहे.     

 
 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...