राज्यात उष्णतेची लाट येणार

राज्यात उष्णतेची लाट येणार
राज्यात उष्णतेची लाट येणार

पुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. बुधवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) विदर्भात, तर उद्यापासून (ता.२६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  राज्यात सध्या अंशत: ढगाळ आकाशासह उष्ण व कोरडे हवामान आहे. मागील आठवड्यात सरासरीच्या खाली उतरलेले तापमान पुन्हा सरासरीच्या वर सरकले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे असून, ब्रह्मपुरीपाठोपाठ अकोला, चंद्रपूर वर्धा येथे तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक आहे. तर, जळगाव, मालेगाव, बीड, परभणी येथेही तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याने उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.     बुधवारी (ता.२४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.३ (२.३), जळगाव ४२.२ (०.३), कोल्हापूर ३९.५ (२.२), महाबळेश्वर ३४.३ (२.२), मालेगाव ४२.८ (२.५), नाशिक ४०.१ (१.९), सांगली ३९.५ (०.७), सातारा ४०.१ (२.९), सोलापूर ४१.३(०.९), अलिबाग ३१.४ (-०.५), डहाणू ३४.६ (१.६), सांताक्रूझ ३४.८ (१.८), रत्नागिरी ३४.६ (२.३), औरंगाबाद ४०.९ (१.८), बीड ४२.१ (२.४), परभणी ४३.२ (२.१), उस्मानाबाद ४०.९ (१.८), अकोला ४३.४ (१.९), अमरावती ४२.६ (१.१), बुलडाणा ४०.६ (१.१), बह्मपुरी ४५.१ (४.१), चंद्रपूर ४३.४ (१.२), गोंदिया ४१.० (०.०), नागपूर ४२.५ (१.४), वर्धा ४३.८ (२.३), यवतमाळ ४२.२(१.३).  चक्रीवादळाचा दक्षिण भारताला धोका बंगालच्या उपसागरात आज (ता.२५) श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास पोषक स्थिती आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन, मंगळवारपर्यंत (ता.३०) श्रीलंका आणि तमिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ तमिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, दक्षिण तमिळनाडून ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com