agriculture news in Marathi, heat will down this year, Maharashtra | Agrowon

यंदा उन्हाचा ताप गतवर्षीपेक्षा कमी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे : देशातील पूर्व आणि दक्षिण राज्ये वगळता उर्वरित भागात यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्याचा हंगाम थंड असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मुख्यत: उष्ण असलेल्या उपविभागात यंदा सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा येतील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : देशातील पूर्व आणि दक्षिण राज्ये वगळता उर्वरित भागात यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्याचा हंगाम थंड असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मुख्यत: उष्ण असलेल्या उपविभागात यंदा सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा येतील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मॉन्सून मिशल कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीम माॅडेलच्या साह्याने हवामान विभागातर्फे उन्हाळा आणि थंडीचे पूर्वानुमान देण्यात येते. हवामान विभागाने २८ फेब्रुवारी रोजी पूर्वमोसमी हंगामाचा (मार्च, एप्रिल, मे) अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार पूर्वमोसमी हंगामात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (ता. १) देशातील उन्हाळा हंगामाचे (एप्रिल, मे, जून) उपविभागनिहाय पूर्वानुमान जाहीर केले. 

कमाल तापमान
जम्मू काश्‍मीर, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये एप्रिल ते जून महिन्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक अंशाने अधिक राहणार आहे, तर उत्तराखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ ते १ अंशाने अधिक आणि उर्वरित सर्वच उपविभागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ०.५ कमी किंवा अधिक असण्याची शक्यता आहे. 

किमान तापमान
पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पश्‍चिम-उत्तर प्रदेश, पूर्व आणि पश्‍चिम राजस्थामध्ये रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा एक अंशाने अधिक राहील. जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार झारंखड, पूर्व-पश्‍चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरातमध्ये किमान ०.५ अंश ते १ अंशाने अधिक असेल. उर्वरित उपविभागांत कमान तापमान ०.५ अंशापेक्षा कमी असेल. 

सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा
उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येणाऱ्या विभागांमध्ये (हीट वेव कोअर झोन) यंदा उष्णतेच्या सवसाधारण लाटा येण्याची शक्यता आहे. यात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशाचा किनारा या भागांचा समावेश आहे.
 
‘ला-निना’चा प्रभाव जूनअखेरपर्यंत?
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची स्थिती विचारात घेता, या भागात सध्या ला-निना स्थितीचा प्रभाव कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे; मात्र वातावरणातील स्थितीवरून ‘ला-निना’ असल्याचे स्पष्ट होत नाही; मात्र माॅन्सून मिशन कपल्ड माॅडेलनुसार किमान जूनअखेरपर्यंत ‘ला-निना’ स्थिती कायम राहणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...