उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता

उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता

पुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी पाऊस थांबल्यानंतर सूर्य पुन्हा तळपू लागला आहे. उन्हाचा चटका वाढून राज्याच्या कमाल तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.  राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी ४० अंशांच्या जवळपास तापमान पोचले असून, अकोल्यासह अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.   सोमवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६ (०.६), जळगाव ४०.८ (-१.१), कोल्हापूर ३६.६ (-०.७), महाबळेश्वर ३२.५ (०.४), मालेगाव ४१.२ (०.९), नाशिक ३७.७ (-१.१), सांगली ३७.७ (-१.१), सातारा ३७.४ (०.२), सोलापूर ४०.४(०.०), अलिबाग ३३.७ (१.८), डहाणू ३३.० (०.०), सांताक्रूझ ३२.५ (-०.५), रत्नागिरी ३३.० (०.७), औरंगाबाद ३९.० (-०.१), परभणी ४१.९ (०.८), उस्मानाबाद ४०.१ (१.०), बीड ४०.० (०.३), अकोला ४२.२ (०.७), अमरावती ४१.६ (०.१), बुलडाणा ३९.२ (१.३), बह्मपुरी ४१.७ (०.७), चंद्रपूर ४०.५ (-१.७), गोंदिया ३८.५ (-२.५), नागपूर ३९.५ (-१.६), वर्धा ४१.२ (-०.३), यवतमाळ ३९.५(-१.४).  कमी दाब क्षेत्राचे संकेत बंगालच्या उपसागरात गुरुवारी (ता. २५) श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारपर्यंत (ता. २७) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंका ओलांडून तमीळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com