agriculture news in marathi, heatwave in affects Banana crop | Agrowon

उष्णतेच्या लाटेने केळीबागांना फटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

जळगाव : खानदेशात उष्णतेची लाट आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहत असून, परिणामी केळीची कोवळी रोपे आणि चार ते पाच महिने कालावधीच्या केळीबागांना फटका (सन स्ट्रोक) बसला आहे. यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव भागातील कांदेबागांना हा फटका अधिक असून, यामुळे बागांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे १५ हजार हेक्‍टवरील लहान बागांवर उष्णतेमुळे परिणाम झाला आहे. 

जळगाव : खानदेशात उष्णतेची लाट आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहत असून, परिणामी केळीची कोवळी रोपे आणि चार ते पाच महिने कालावधीच्या केळीबागांना फटका (सन स्ट्रोक) बसला आहे. यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव भागातील कांदेबागांना हा फटका अधिक असून, यामुळे बागांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे १५ हजार हेक्‍टवरील लहान बागांवर उष्णतेमुळे परिणाम झाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, धुळ्यातील शिरपूर तालुक्‍यातील तापी व अनेर काठावरील केळीची कोवळी रोपे होरपळल्याची स्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागेभोवती पश्‍चिमेला आणि दक्षिणेला वारा अवरोधक उभारले किंवा वाढविले आहेत त्यांच्या केळीबागांमध्ये फारसे नुकसान नाही. 

रावेरात सध्या पिलबाग व मृगबागा कापणीवर आहेत. मुबलक पाणी आणि चांगल्या व्यवस्थापनामुळे रावेरात तापीकाठ आणि उत्तर पूर्व भागात नुकसानीचे प्रमाण कमी आहे. परंतु सातपुडा पर्वतालगतच्या खिरोदा, चिनावल, निंभोरा, खिर्डी भागांतील बागांना काहीसा फटका बसल्याची माहिती आहे. यावलमध्येही भालोद, डोंगरकठोरा, सांगवी, साकळी भागात उष्णतेचा केळीबागांना फटका बसल्याचे सांगण्यात आले. 

चार ते पाच महिने आणि यापेक्षा कमी कालावधीच्या बागांमध्ये बागेची पाने करपत आहेत. मुबलक सिंचन करूनही पाने करपत आहेत. एक हजार झाडांमध्ये २० ते २२ झाडांना उष्णतेचा अधिक फटका आहे. तर पश्‍चिम व दक्षिणेकडील झाडांची पाने पूर्णतः फाटून त्यांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. 

चोपडा तालुक्‍यात अनेर व तापी नदीकाठी केळी बागा अधिक आहेत. परंतु उत्तम पाणी व्यवस्थापन व आच्छादनामुळे बागांना फारसा फटका बसलेला नाही. जळगाव, पाचोरा भागात मात्र गिरणा, तितुर नदीकाठावरील बागांमध्ये केळीची पाने करपण्याचे, घड सटकण्याचे प्रकार झाल्याची माहिती आहे. 

जळगावचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
तारीख    कमाल तापमान
२५ एप्रिल  :  ४३.०
२६ एप्रिल  :  ४२.६
२७ एप्रिल  :  ४३.०
२८ एप्रिल  :  ४५.०
२९ एप्रिल  :  ४४.४

केळीबागांना दिवसा सिंचन 
अधिक करीत आहोत. मागील १०-१२ दिवसांत तापमान सतत ४१ अंश सेल्सिअसवर असल्याने लहान केळीबागांवर अधिक परिणाम दिसत आहे. पाने उष्ण वाऱ्याने फाटून करपली आहेत. यामुळे २० ते २२ टक्के नुकसान निश्‍चित आहे. 
- मनोहर पाटील, 
शेतकरी, चोपडा (जि. जळगाव)

इतर अॅग्रो विशेष
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...