विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा

विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा

पुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

‘वायू’ चक्रीवादळ रविवारी गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर गेले होते. या वादळाबरोबरच अरबी समुद्रातील बाष्प खेचून नेले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात पूर्वमोसमीच्या सरी थांबल्या आहेत. कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. मात्र, ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील तापमान कमी झाले आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, मराठवाडातही लाटेची स्थिती आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड येथे उष्ण लाट आली आहे. 

रविवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.१ (१.०), जळगाव ४०.२ (२.७), कोल्हापूर ३१.२(२.२), महाबळेश्वर २१.१ (-१.०), मालेगाव ३९.० (३.९), नाशिक ३१.४ (-१.३), सांगली ३२.४ (१.८), सातारा ३०.६ (१.१), सोलापूर ३७.३ (३.५), अलिबाग ३१.७ (०.६), डहाणू ३३.१ (०.६), सांताक्रूझ ३३.९ (२.०), रत्नागिरी ३१.८ (१.९), औरंगाबाद ३६.० (२.५), परभणी ४०.७ (५.४), नांदेड ४२.० (५.६), अकोला ४२.३ (५.४), अमरावती ४१.२ (४.३), बुलडाणा ३९.० (५.७), ब्रह्मपुरी ४४.३ (७.४), चंद्रपूर ४४.०(६.९), गोंदिया ४३.०(५.४), नागपूर ४३.२ (५.८), वाशिम ४०.६, वर्धा ४२.५ (५.६), यवतमाळ ४०.८(४.८).  रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)   कोकण : ठाणे २६, किहीम २१, सरल ३१, उरण ६३, कापरोली ६१, जसइ ५९, देव्हरे २८. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १४, बामणोली ३५, हेळवाक १५, तापोळा १३, लामज २८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com