agriculture news in marathi, heatwave continues in maharashtra | Agrowon

महाराष्ट्राचा ताप आेसरेना...
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 मे 2018

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची लाट आली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा सातत्याने ४३ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारपर्यंत (ता.३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून, राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ ते ४४ अंश राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची लाट आली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा सातत्याने ४३ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारपर्यंत (ता.३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून, राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ ते ४४ अंश राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

एप्रिल महिन्यात वाढलेला उन्हाचा चटका कायम अाहे. राजस्थानमधील फालोदी येथे देशातील उच्चांकी ४७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा वाढतच असून, गेले काही दिवस बहुतांशी ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, 
यवतमाळ येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान अाहे. 

अंदमान समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता. २) विरून गेले होते. उत्तर अंदमान आणि आरकन किनाऱ्यावर ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, तमिळनाडूपर्यंत आणि छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा तमिळनाडूपर्यंत दोन वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. यामुळे मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून, शनिवारी (ता. ५) व रविवारी (ता. ६) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

  बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.७, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३४.३, मालेगाव ४३.२, नाशिक ३७.९, सांगली ४०.४, सातारा ४१.२, सोलापूर ४३.४, मुंबई ३४.०, अलिबाग ३२.९, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.२, औरंगाबाद ४२.०, परभणी ४४.५, नांदेड ४४.५, अकोला ४४.५, अमरावती ४३.६, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४५.९, गोंदिया ४३.४, नागपूर ४४.५, वर्धा ४५.०, यवतमाळ ४४.०.

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे...
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या...
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...