agriculture news in marathi, heatwave in maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

पुणे : दोन दिवस घटलेल्या तापमानात पुन्हा वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या वर जात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे तापमान यंदाच्या हंगामात उच्चांकी ४७.५ अंशांवर पोचले आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात शनिवारी वादळी पावसाची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. २०) राज्यात कोरड्या मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.     

पुणे : दोन दिवस घटलेल्या तापमानात पुन्हा वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या वर जात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे तापमान यंदाच्या हंगामात उच्चांकी ४७.५ अंशांवर पोचले आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात शनिवारी वादळी पावसाची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. २०) राज्यात कोरड्या मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.     

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर सरकला होते. नगर, जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. चंद्रपूर येथे ११ मे रोजी यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे पारा ४७.५ अंशावर पोचला होता.  

   अरबी समुद्रात आलेले ‘सागर’ चक्रीवादळ अदेन (येमेन) च्या खाडीमध्ये घोंगावत होते. ताशी १८ किलोमीटर वेगाने पश्‍चिमेकडे सरकणारे वादळ रविवारी दुपारपर्यंत सोमालीयाच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. जमिनीवर येताच या वादळाची तीव्रता कमी होणार आहे. तर अग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटक आणि केरळदरम्यान वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले होते.

रविवारपासून हवामान मुख्यत: कोरडे राहणार असून, उन्हाचा चटका वाढणार आहे. तर विदर्भात शनिवारी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दरम्यान गुरवारी (ता. १७) सायंकाळनंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. पुण्यातही मेघगर्जना, विजांसह हलक्या पावसाने शिडकावा केला. वादळामुळे झाडपडीच्या घटना घडल्या. शुक्रवारी (ता. १८) दुपारनंतर रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये ढग गोळा झाले होते. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अंशत: ढगाळ हवामान होते. 

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...