agriculture news in marathi, heatwave will continue in state | Agrowon

उन्हाचा चटका कायम राहणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीसह विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे उष्णतेची लाट होती. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. २३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तर शनिवारपर्यंत (ता. २५) विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४१.३ (४.६), जळगाव ४३.४ (०.७), कोल्हापूर ४०.४ (५.२), महाबळेश्वर ३५.६ (५.९), मालेगाव ४३.८ (३.८), नाशिक ४०.३ (२.६), सांगली ४२.७ (६.२), सातारा ४०.९ (५.७), सोलापूर ४४.३ (४.२), अलिबाग ३१.३ (-२.०), डहाणू ३५.१ (०.९), सांताक्रूझ ३४.८ (१.४), रत्नागिरी ३३.७ (०.८), औरंगाबाद ४१.६ (२.१), बीड ४३.७ (३.७), नांदेड ४३.५ (२.०), परभणी ४४.८ (३.०), अकोला ४४.६ (२.५), अमरावती ४३.० (०.६), बुलडाणा ४२.० (३.६), बह्मपुरी ४५.९ (३.८), चंद्रपूर ४५.८ (२.८), गोंदिया ४३.५ (१.४), नागपूर ४४.२ (१.५), वर्धा ४५.५ (२.८), यवतमाळ ४३.८(२.१).

मॉन्सूनची प्रगती नाही
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला. मात्र मॉन्सूनची अंदमानातील प्रगती मंदावल्याने मंगळवारी वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही. गुरुवारपर्यंत (ता. २३) मॉन्सून उत्तर अंदमानात पोचण्याचे पाषक स्थिती असल्याचे हवामान   विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...