agriculture news in marathi, Heavy, moderate rain in Jalgaon | Agrowon

जळगाव जिह्याच्या पश्‍चिम भागात बऱ्यापैकी पाऊस
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) दुपारी जोरदार पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या पश्‍चिम भागात गिरणा काठावरील गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे धूळपेरणी केलेल्या बिया अंकुरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 

दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास सर्वत्र पाऊस सुरू झाला. चोपडा, धरणगाव भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगरातही सरी कोसळल्या. तर जळगाव, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव भागात दमदार पाऊस झाला. सुमारे तासभर पाऊस झाला. 

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) दुपारी जोरदार पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या पश्‍चिम भागात गिरणा काठावरील गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे धूळपेरणी केलेल्या बिया अंकुरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 

दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास सर्वत्र पाऊस सुरू झाला. चोपडा, धरणगाव भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगरातही सरी कोसळल्या. तर जळगाव, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव भागात दमदार पाऊस झाला. सुमारे तासभर पाऊस झाला. 

चोपडा, रावेर व यावल भागातील नदी, नाल्यांना मात्र अजून पूर आलेला नाही. मध्य प्रदेशात उगम क्षेत्र असलेली रावेर तालुक्‍यातील सुकी नदी खळाळून वाहू लागली आहे. कारण मध्य प्रदेशात या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसामुळे कुठेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. चोपडा तालुक्‍यात सुमारे १८ मिलिमीटर, यावलमध्ये २० मिलिमीटर, जळगावात २२ मिलिमीटर, चाळीसगावात ३४ मिलिमीटर, पाचोरा येथे २५ मिलिमीटर, भडगावात १८ मिलिमीटर, रावेरात १७ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली.

जामनेर, बोदवड, भुसावळ व मुक्ताईनगरातही हलक्‍या व मध्यम स्वरुपाचा पाऊस ठिकठिकाणी झाल्याचे सांगण्यात आले. भुसावळ व बोदवडमध्ये मात्र पेरणीलायक पाऊस झालेला नाही. चाळीसगाव भागातही सुमारे दीड तास दमदार बरसला. यामुळे शेतीकामे बंद करावी लागली. यावलमध्येही मजुरांना वाफसा नसल्याने काम सोडून घरी परतावे लागले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस चाळीसगाव तालुक्‍यात झाला असून, सुमारे ५० मिलिमीटर एकूण पाऊस आहे. 

धुळे, नंदुरबारातही हजेरी
धुळे व नंदुरबार भागातही पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे व साक्री येथे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारातही तळोदा, शहादा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारात सातपुडा पर्वतालगत मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...