राज्यातील ५३ मंडळांत अतिवृष्टी
संदीप नवले
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंत ५३ मंडळांत अतिवृष्टी झाली अाहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकमधील, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद जिल्ह्यासह उर्वरित जिल्ह्यांत नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले आहे. यामुळे जायकवाडी, येडगाव, चासकमान, वीर, उजनी, गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर आदी धरणांतून पुन्हा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी काही नद्यांना पूर आला आहे.

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंत ५३ मंडळांत अतिवृष्टी झाली अाहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकमधील, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद जिल्ह्यासह उर्वरित जिल्ह्यांत नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले आहे. यामुळे जायकवाडी, येडगाव, चासकमान, वीर, उजनी, गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर आदी धरणांतून पुन्हा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी काही नद्यांना पूर आला आहे.

सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. मंगळवारी (ता.११) सायंकाळी कोकणातील ठाणे, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर ठाणेमधील न्याहाडी, किन्हवली, रत्नागिरीतील शिरगाव, पालघरमधील खोडला येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत असल्यामुळे भातसा, अप्परवैतरणा ही धरणातील पाणीपातळीत वाढ झाली होती.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नाशिकमधील कानशी, दळवत, लासलगाव, उम्रने धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, सोनगीर, नागाव, धुळे खेडे, कुसुम्बा, नेर, जळगावमधील तामसवाडी, नगरमधील बांभोरा, कोपरगाव, सोलापूरमधील वाघोली, मोहळ, माढा, पंढरपूर, भंडीशेगाव, पतकुरोळी, पुलूज, तुगट, सांगोला, शिवने, सोनंद, महूड, नाझरा, सांगेवाडी, मंगळवेढा साताऱ्यातील म्हसवड मंडळात अतिवृष्टी झाली.

त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन विसर्ग सोडण्यात आला होता. परिणामी गोदावरी नदीला पूर आला होता. सोलापूरमध्ये दमदार पावसामुळे माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील तोंडले बोंडले येथील घुमेरा ओढ्याला पूर आला. तालुक्यातील पिलीव, गारवाड, चांदापुरी, तरंगफळ, कारखेल घाट, निमगाव, मळोली तसेच घुमेरा ओढ्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातही हलका पाऊस पडला.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही अनेक मंडळात अतिवृष्टी झाली. तर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते. तर जालन्यातील भोकरदन, बीडमधील बीड, दासखेड, दिग्रुड, आंबेजोगाई, पाटोदा, लोखंदी, गंतनांदुर, बर्दापूर, परळी, नागापूर, पिंपळगाव, मोहखेड, लातूरमधील तांदुळजा, रेणापूर, पानगाव, पाडोळी, मंगळूर मंडळात अतिवृष्टी झाली.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर एका मंडळात अतिवृष्टी झाली. बुलडाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. तर वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी ऊन पडले होते.

जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण (मिलीमिटर)
ठाणे ः न्याहाडी 70, किन्हवली 98.6,
रत्नगिरी ः शिरगाव 98,
पालघर ः खोडला 76.8
नाशिक ः कानशी 71, दळवत 70, लासलगाव 77.2, उम्रने 71
धुळे ः धुळे शहर 71, सोनगीर 85, नगाव 90, धुळे खेडे 78, कुसुंबा 88, नेर 70,
जळगाव ः तामसवाडी 91,
नगर ः बांबोरा 102, कोपरगाव 92,
सोलापूर ः वाघोली 82, मोहळ 88, माढा 89.5, पंढरपूर 93, भंडीशेगाव 70, पतकुरोळी 82, पुलूज 72, तुगट 75,
सांगोला 93, शिवणे 84, सोनंद 90, महूड 95, नाझरा 100, सांगेवाडी 85, मंगळवेढा 175
सातारा ः म्हसवड 70,
जालना ः भोकरदन 92,
बीड ः बीड 70, दासखेड 80, दिग्रुड 80, आंबेजोगाई 89, पाटोदा 72, लोखंदी 71, गंतनांदूर 75, बर्दापूर 88, परळी 93, नागापूर 155, पिंपळगाव 110,
मोहखेड 77,
लातूर ः तांदूळजा 70, रेणापूर 110, पानगाव 112, पाडोळी 75, मंगळूर 80,
अकोला ः पानज 120, उमारा 100,

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...