agriculture news in marathi, Heavy rain accompanied with windstorm in some parts of Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

सांगली ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३) रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. कडेगावसह तालुक्‍यात वांगी व अन्य भागांत तसेच तासगाव तालुक्‍यातील सावळजमध्ये जोरदार पाऊस झाला. वांगी (ता. कडेगाव) येथे वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सांगली ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३) रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. कडेगावसह तालुक्‍यात वांगी व अन्य भागांत तसेच तासगाव तालुक्‍यातील सावळजमध्ये जोरदार पाऊस झाला. वांगी (ता. कडेगाव) येथे वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी नांगरट, खुरटणी, सरी सोडणे आदी मशागतींला वेग येणार आहे. तासगाव पूर्व भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह तासभर मुसळधार पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ताली, बांध तुडूंब भरले. वनविभाग व माळरानावर सी. सी. टी अंतर्गतच्या कामातून खोदलेल्या चऱ्या, लहान ओढे, बंधारे, तुडूंब भरून वाहत होत्या.

खानापूर-विटा तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या तालुक्‍यात ५१.४ मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्‍यात पाऊस झाल्याने आगाप धूळवाफेवर भाताची पेरणी झालेल्या पिकास उपयुक्त ठरणार आहे. शेतकरी पावसाची खरीप हंगामातील मशागती आणि पेरणीसाठी प्रतीक्षा करत होता. अाता खरीप हंगामातील मशागतीला वेग वाढणार आहे.

परिसरात चांगला पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागतीला गती मिळेल. पावसाने खरीप हाती लागण्याची आशा वाढली. द्राक्षबागांनाही फायदा होईल.
- मोहन टेके, आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...