अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायम

अकोले तालुक्यात पाऊस
अकोले तालुक्यात पाऊस

नगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत घाटघर, रतनवाडीला दमदार पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा धरणासह मुळा, निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. आतापर्यंत भंडारदरा धरण ७८, तर मुळा धरण ४३ टक्के भरले आहे.

अकोले तालुक्‍यातील पश्‍चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत घाटघरला १६५, रतनवाडीला १६१, पांजरे येथे १४८, भंडारदरा येथे १६०, निळवंडेला ३३, अकोले येथे २६, कोतुळ येथे ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुळा धरणात होणारी पाण्याची आवक मंगळवारच्या तुलनेत कमी झाली आहे. सध्या ८ ३७३ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू असून, ११ हजार १६९ दशलक्षघनफूट पाणीसाठा झाला आहे. भंडारदरा धरणात ८५८७ दशलक्षघनफूट पाणीसाठा झाला असून, धरण ७८ टक्के भरले आहे. निळवंडे धरणातील साठा ३० टक्‍क्‍यांच्या जवळपास आला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com