agriculture news in marathi, heavy rain in akole taluka, nagar, maharashtra | Agrowon

अकोले तालुक्‍यात जोरदार पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

दरवर्षी कोतूळचा पूल सात ते आठ महिने पाण्याखाली जातो. त्यामुळे पांगरी, पोरेवाडी, पिंपळगाव खांड येथील मुलांना कोतूळ येथे शिक्षण घेण्याकरिता जाण्यासाठी खासगी होडीचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास तसा रामभरोसे आणि पालकांना दररोज चिंतेत टाकणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी जलसंपदा विभागाने सहकार्य करावे.
- रघुनाथ डोंगरे, पांगरी, ता. अकोले, जि. नगर.

नगर  ः अकोले तालुक्‍यातील भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रांत सोमवार (ता. २५) पासून जोरदार पाऊस पडत आहे. हरिश्‍चंद्रगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यातून मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाचा पाणी फुगवटा वाढत चालल्याने या नदीवरील कोतूळ येथील मुख्य वाहतुकीचा पूल मंगळवारी मध्यरात्री पाण्याखाली गेला. रतनवाडी येथे सर्वाधिक ३५५ मिमी पावसाची नोंद झाली.  

अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यंदा उशिराने पाऊस सुरू झाला आहे. सोमवारपासून (ता. २५) भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हरिश्‍चंद्रगडाच्या पट्ट्यातील आंबीत धरण पहिल्याच दिवशी भरले. आताही पावसाचा जोर कायम असल्याने पिंपळगाव खांड धरण दोन दिवसांत भरू शकते.

कोतूळ येथील पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल पावसाळ्यात सुमारे सात ते आठ महिने पाण्याखाली असतो. अकोले, राजूर, शेंडी, पांजरे, वाकी, घाटघर, रतनवाडी परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. रतनवाडी येथे सोमवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ३५५ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय भंडारदरा-शेंडी येथे १८७, पाजंरे येथे २२१, घाटघर येथे १९५, वाकी येथे १३५, अकोले येथे ८७, राजूर येथे ६१, ब्राह्मणवाडा येथे ६, समशेरपूर येथे ३४, कोतूळ येथे २६, विरगाव येथे १६ तर साकिरवाडी येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भंडारदरा धरणात चोवीस तासांत २२१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेरमधील दोन महसूल मंडळे सोडली तर जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र पाऊस झालेला नाही.

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...