agriculture news in marathi, Heavy rain in Beed district | Agrowon

बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

बीड : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सोमवारी (ता. ४) रात्री तसेच मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. अंबाजोगाई व या तालुक्यातील लोखंडी सावरगाव व माजलगाव या तीन महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली. वडवणी व शिरूर हे दोन तालुके वगळता नऊ तालुक्यांत पाऊस झाला. पैकी पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला.

बीड : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सोमवारी (ता. ४) रात्री तसेच मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. अंबाजोगाई व या तालुक्यातील लोखंडी सावरगाव व माजलगाव या तीन महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली. वडवणी व शिरूर हे दोन तालुके वगळता नऊ तालुक्यांत पाऊस झाला. पैकी पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला.

पावसाच्या या आगमनाने बळिराजा सुखावला आहे. काही ठिकाणी नुकसानही झाले. जिल्ह्यात विशेषतः माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यांत सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. याशिवाय काही भागांत पावसाने हलकी हजेरीही लावली होती. यानंतर सोमवारी रात्री व पुन्हा मंगळवारी पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात एकूण १४३.४ मिमी, तर सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. खरिपाच्या पेरण्यांचा हा काळ असल्याने पावसामुळे शेतकरी सुखावला असून, शेतकऱ्यांना आता खरीप पेरण्यांचे वेध लागले आहेत. अद्यापही एखाद्या जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून, आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना प्रारंभ करण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गतवर्षी बोंड अळीने दगा दिल्यामुळे उत्पादनात अर्ध्यापेक्षा अधिक घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरिपाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर माजलगाव आणि बीड येथील हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा व तूर भिजून नुकसान झाले.

तीन महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद
माजलगाव महसूल मंडलात ७० मिमी, अंबाजोगाई महसूल मंडलात ७० मिमी, तर लोखंडी सावरगाव मंडलात ७७ मिमीची नोंद झाली आहे. याशिवाय दिंद्रूड मंडलात ६३ मिमी, परळी मंडलात ४२ मिमी, गंगामसला मंडलात ४० मिमी, तर तेलगाव मंडलात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६३ महसूल मंडल असून, यापैकी ४३ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसामुळे काही भागांत शेतीमध्ये पाणी साचले असून, छोटे नाले व ओढेही वाहू लागले आहेत.

पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस
दरम्यान, सोमवार रात्री ते मंगळवार सकाळपर्यंत पाटोदा, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव आणि केज या तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला. इतर चार तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.

तालुकानिहाय पाऊस

बीड  ७.३ मिमी
पाटोदा  ५.५ मिमी
गेवराई  ३.३ मिमी
अंबाजोगाई  ३४.२ मिमी
माजलगाव  ३७.३ मिमी
केज  १७.१ मिमी
धारूर  २५ मिमी
परळी  १२.८८ मिमी
आष्टी  ०.९ मिमी
शिरूर कासार  ००

 

इतर बातम्या
पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोकोअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा...
प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील...परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा...
मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबूनऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या...
खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकीजळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य,...
दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करानांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण...
`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळतीसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात...
`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची...सोलापूर  : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी...
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३...सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा...
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...