agriculture news in marathi, heavy rain causes summer and horticulture crop | Agrowon

वादळी पावसाने पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने रब्बी गहू, कांदा, हरभरा, उन्हाळी मका, टोमॅटो, काकडी, भाजीपाला पिके, आंबा, कलिंगड, डाळिंब, सीताफळ, केळीसह फळबागांना दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, अौरंगाबाद, बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वारे, गारपिटीसह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, विजा आणि झाडपडीच्या घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे. 

पुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने रब्बी गहू, कांदा, हरभरा, उन्हाळी मका, टोमॅटो, काकडी, भाजीपाला पिके, आंबा, कलिंगड, डाळिंब, सीताफळ, केळीसह फळबागांना दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, अौरंगाबाद, बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वारे, गारपिटीसह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, विजा आणि झाडपडीच्या घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे. 

सातारा जिल्ह्याला मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटांसह पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यात मणदुरे (ता. पाटण) येथे घराचे छप्पर अंगावर पडून दीपक पांडुरंग जाधव (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या असून, कऱ्हाड व पाटण तालुक्यातील आंबा, टोमॅटो, काकडी, वांगी, कलिंगड या पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. कऱ्हाडमधील कोपर्डे हवेली परिसरात गारा पडल्या. मसूर परिसरात आंब्यांच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला होता. खटाव तालुक्‍यातील बुध, राजापूर, औंधसह परिसरात मंगळवारी दुपारी व सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. 

पुणे जिल्ह्यात मंगळवारी  बारामती, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर, खेड तालुक्यांत तुरळक गारपिटीसह वादळी पावसाने दणका दिला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने विविध भागांत गहू, कांद्यासह भाजीपाला आणि केळी, डाळिंब, चिकू, सीताफळ, आंबा पिकांचे नुकसान झाले. दहीवडी (ता. शिरूर) येथे वीज कोसळून आठ मेंढ्या, एका बैलाचा मृत्यू झाला. तर इंदापुरात अंगावर झाड पडल्याने एक जण मृत्युमुखी पडला. 

सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूससह शिराळा तालुक्‍यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, येळापूर, मेणी, गुढे पाचगणीसह परिसरात विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. नव्याने केलेल्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खिरवडे येथील चंद्रकांत ज्ञानदेव पवार हे सावताच्या डोंगरात जनावरे चारायला घेऊन गेले असता, त्यांच्या देशी गाय व रेडकावर वीज पडून मृत्यू झाला असून, यात त्यांचे १ लाखाचे नुकसान झाले आहे. 

नगर जिल्ह्यातील संगमनेर, कर्जत, पारनेर तालुक्‍यांत गारपीट, तर नगर, अकोले तालुक्‍यांत जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे फळबागांसह कांदा व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. नगर-जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील येथे काढून ठेवलेला कांदा व आंब्याचे मोठे नुकसान झाले. भंडारदरा परिसरात गहू व पेंढा यांचे नुकसान झाले. पांजरे येथे वीज पडून शांताबाई भोरू उघडे (वय ४०) व तुकाराम उघडे (वय ४५) गंभीर जखमी झाले. कर्जत तालुक्‍यातील राशीनसह परिसरात संततधार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. आंबा, चिकूच्या बागा आणि हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले. पारनेर तालुक्‍यातील कान्हुर पठार, काकणेवाडी, पिंपरी पठार येथे पाऊस झाला. गारगुंडी येथे तब्बल अर्धा तास गारांच्या पावसाने टॉमेटो, आंबा, भाजीपालासह अन्य पिकांना दणका दिला. 

नाशिक शहरासह, सटाणा, निफाड भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार अाहे. निफाड तालुक्‍यातील खेरवाडी, चांदोरी, सोनगाव, भेंडाळी, सायखेडा परिसरात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. द्राक्षबागांची कामे, गहू, उन्हाळी कांदा काढणीची कामे पावसामुळे खोळंबली. 

मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मानाबादसह जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वादळासह हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यांतर्गत कडा परिसरात दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कडा जवळील देवी निमगाव येथे वीज पडून मंदा राजेंद्र राऊत या महिलेचा मृत्यू झाला. केरूळ येथे काही घरांवरील पत्रे उडून गेले. या घटनेत पाच जण जखमी झाले. पाटोदा परिसरात पावसामुळे मिरची, आंबा, टरबूज या पिकांना फटका बसला. उस्मानाबाद, लातूर शहरांतही सायंकाळी वादळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यात रोहिलागड, किनगाव (ता. अंबड) परिसरात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरासह चित्तेपिंपळगाव, निपाणी, झाल्टा पाचोड, आडगाव व वैजापूर शहरांसह तालुक्‍यातील पावसाने हजेरी लावली. 

सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर बहुतेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा कहर केला. पंढरपूर, माढा, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, माळशिरस या तालुक्‍यांत पावसाने फळबागांचे नुकसान केलेच. वादळी वाऱ्याच्या या फटक्‍यात बैल, म्हैस आणि गाईसह पाच जनावरेही दगावली. दुपारी साडेचार ते रात्री नऊपर्यंत विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सतत सुरू होता.

धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांत ढगाळ हवामान, उकाड्यामुळे पिकांना फटका बसला अाहे. उन्हाचा चटका वाढल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांनी कामाच्या वेळा बदलल्या आहेत. वेलवर्गीय कलिंगड, कारल्यासह, केळीच्या बागांवर अचानक वाढलेल्या उन्हामुळे ‘सन स्ट्रोक''ची समस्या वाढली आहे. उन्हामुळे दूध उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वादळाने नुकसान... 

  • कोकणासह मराठवाड्यात आंब्याचे नुकसान
  • संगमनेर कारखान्याला ३० कोटींना झटका
  • विजा, झाडपडीमुळे जीवितहानी
  • अनेक भागात गारपिटीने नुकसान वाढले
  • वीजपुरवठा खंडित; वाहतूक काही काळ ठप्प

  या पिकांचे नुकसान 

  •  लेट रब्बी : गहू, हरभरा कांदा
  •  उन्हाळी पिके : मका, टोमॅटो, काकडी भाजीपाला आदी
  •  फळे : आंबा, काजू, केळी, कलिंगड, डाळिंब, सीताफळ अादी. 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...