पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

धरणक्षेत्रात पाऊस
धरणक्षेत्रात पाऊस

पुणे  : पुणे जिल्ह्यातील पश्चिम भाग आणि धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाने दमदार बरसात केली आहे. पुणे शहर आणि पूर्वेकडील काही भागातही पावसाची संततधार होती. मुळशी तालुक्यातील मुठे येथे सर्वाधिक १५५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणांमध्ये तब्बल ५.२८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व धरणांची क्षमता २१६.८४ टीएमसी असून, शुक्रवारी धरणांमध्ये २९.४० टीएमसी (१३.५६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा चांगलाच जोर सुरू आहे. शुक्रवारी (ता.६) सकाळपर्यंत जिल्ह्यातील ७२ मंडळांत चांगला पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतील काही मंडळात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे भात खाचरे पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले आहेत. गुंजवणी, भाटघर, नीरा देवधर, वीर, माणिकडोह, डिंभे, चासकमान, मुळशी, पवना, वरसगाव, पानशेत, टेमघर या धरणांच्या पाणीसाठ्यात भर पडत आहे.  

मुळशीतील पौड, घोटावडे, मळे येथेही ७0 मिमीहून अधिक पाऊस पडला. वेल्ह्यातील पानशेत १०८ मिमी पाऊस पडला आहे. मावळातील काले येथे सर्वाधिक ८१ मिमी पाऊस पडला, तर लोणावळा येथे ७० कार्ला ५२ मिमी पाऊस पडला. भोर तालुक्यातील भोलावडे सर्वाधिक ९२ मिमी पाऊस झाला आहे. पुणे शहरातील बहुतांशी मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांतही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

जिल्ह्यातील पाऊस (मिमी) : पौड ९२, घोटावडे ८३, माले ९०, मुठे १५५, पिरंगुट ४४, भोलावडे ९२, निगुडघर ५०, काले ८१, कार्ला ५२, लोणावळा ७०, वेल्हे ५७, पानशेत १०८, राजुर ९१, डिंगोरे ३१, वाडा २९, कुडे २८.

धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिमीमध्ये) : टेमघर १५५, वरसगाव ११०, पानशेत १०८, खडकवासला २२, पवना ८१, कासारसाई २९, मुळशी ९०, कलमोडी ४८, चासकमान ३२, वडीवळे ४७, गुंजवणी ४०, माणिकडोह ४४, पिंपळगाव जोगे ४०, येडगाव २१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com