पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बुधवारी जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ हवमान होते. अधूनमधून ऊनही पडत होते. जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे.

बुधवारी सकाळपर्यंत मुळशी, मावळ, भोर आणि जुन्नर तालुक्यांच्या पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. भोर, मुळशी तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागात हलक्या सरींनी हजेरी लावली. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक अाहे.

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ९९, वरसगाव धरण क्षेत्रात २३, पानशेत धरण क्षेत्रात २९, पवना धरण क्षेत्रात ३०, मुळशी धरण क्षेत्रात ६५, आंद्रा धरण क्षेत्रात २४, वडीवळे धरण क्षेत्रात ३०, गुंजवणी धरण क्षेत्रात २३, नीरा देवघर धरण क्षेत्रात ४९, पिंपळगाव जोगे धरण क्षेत्रात २५ मिलिमीटर पाऊस पडला. इतरही धरणांच्या क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस होता. जिल्ह्यातील पाणीसाठ्यात आणखी दीड टीएमसी पाण्याची भर पडली आहे. बुधवारी धरणांमध्ये १८ टीएमसीहून अधिक उपयुक्त साठा झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : पौड ५९, माले ६५, मुठे ६८, पिरंगुट ४७, भोलावडे ६५, आंबवडे ३२, निगुडघर ४९, कार्ला ४४, खडकाळा ४२, लोणावळा ४५, राजूर ३५, डिंगोरे ३६, कुडे ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com