राज्यात परतीच्या पावसाची मुसंडी

उस्मानाबाद ः जेवळी परिसरात मंगळवारी (ता.१०) रात्री साडे नऊ ते दहा या काळात मेघगर्जनेसह अतिवृष्टी झाली आहे. या दमदार पावसाने येथील साठवण तलाव भरून वाहत आहे.
उस्मानाबाद ः जेवळी परिसरात मंगळवारी (ता.१०) रात्री साडे नऊ ते दहा या काळात मेघगर्जनेसह अतिवृष्टी झाली आहे. या दमदार पावसाने येथील साठवण तलाव भरून वाहत आहे.

पुणे : गेल्या महिन्यातील २७ तारखेपासून परतीच्या पावसाने मुसंडी मारली आहे. राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली असून, १ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ६७.४ मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो. मात्र मागील अकरा दिवसांत राज्यात ५७.४ मिलिमीटर म्हणजेच ८५.२ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे तूर, भात, ऊस, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील २०६४ मंडळांपैकी १६२० मंडळांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी विभागाकडील पावसाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले.

एक ते अकरा ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ६७.४ मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो. परंतु सुरवातीच्या एक ते दोन ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. तीन ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली. त्यानंतर सात ऑक्टोबरपासून राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने जोर धरला. त्यामुळे एक ते अकरा ऑक्टोबर या कालावधीत ५७.४ मिलिमीटर म्हणजेच ८५.२ टक्के पावसाची नोंद घेतली गेली.

गेल्या चार महिन्यांत अनेक ठिकाणी कमी-अधिक पाऊस पडला. तसेच काही वेळा पावसाचा मोठा खंडही होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. राज्यात सरासरीच्या ११४० मिलिमीटरपैकी ९२९.४ मिलिमीटर म्हणजेच ८१.५ टक्के पाऊस झाला असून, वीस जिल्ह्यांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परंतु सप्टेंबरअखेरीस पावसाने परतीच्या प्रवासास सुरवात केली.

सध्या परतीचा पाऊस लांबला असला, तरी अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाटामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून ओढे, नाले पुन्हा भरून वाहू लागले आहेत.

कोकणात सरासरी ११५.४ मिलिमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत ९७.२ मिलिमीटर म्हणजे ८४.२ टक्के पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक विभागात सरासरी ५०.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु आतापर्यंत ६४.९ मिलिमीटर म्हणजेच १२७.८ टक्के पाऊस पडला आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पुणे विभागात सरासरी ९१.६ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आतापर्यंत ६६.८ मिलिमीटर म्हणजेच ७२.९ टक्के पाऊस पडला असून नगर, सोलापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात सरासरी ५८.६ मिलिमीटर पाऊस पडतो.

आतापर्यंत या विभागात ५५.२ मिलिमीटर म्हणजेच ९४.२ टक्के पाऊस पडला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७३.४ मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यापाठोपाठ उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला आहे. विदर्भातील अमरावती विभागात सरासरी ४६.१ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत ३७ मिलिमीटर म्हणजेच ८०.३ टक्के पाऊस पडला.

तसेच नागपूर विभागात सरासरी ५३.५ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत येथे ३५.९ मिलिमीटर म्हणजेच ६७.१ टक्के पाऊस पडला आहे. विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतही जोरदार पावसाची नोंद घेतली गेली आहे.

राज्यात १३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय सरासरी व प्रत्यक्षात झालेला पाऊस ः (कंसात झालेला पाऊस) :

ठाणे ९५.२ (११३.९), रायगड १११.६ (१०२.४), रत्नागिरी १४६.८ (९९.१), सिंधुदुर्ग १४१.२ (८७.२), पालघर ७८.९ (६८.७), नाशिक ६०.९ (१२३.५), धुळे ३६ (५०.४), नंदुरबार ४०.९ (२४.६), जळगाव ३९.१ (३०.५), नगर ६१ (६१.२) पुणे ७७.३ (५२.२), सोलापूर ७०.९ (७९.२), सातारा ८७.९ (६५.५), सांगली ९६.३ (५१.६), कोल्हापूर १२६.७ (६३.५), औरंगाबाद ५१.८ (४५.२), जालना ५४.१ (५२.५), बीड ६३.१ (७३.४), लातूर ६३.३ (६३.३), उस्मानाबाद ६६.३ (७०.३), नांदेड ६०.९ (४५.९), परभणी ५५ (५७.१), हिंगोली ४६.३ (४९.५), बुलडाणा ४४.८ (३७), अकोला ३७.६ (५१.२), वाशीम ४५.२ (२३.६), अमरावती ४६.४(४३.७), यवतमाळ ५१ (२९.१), वर्धा ४६.३ (२८), नागपूर ४८.९(३१.७), भंडारा ४९.९ (३५.१), गोंदिया ६३.२ (३८.२),

राज्यात अकरा दिवसांत टक्केवारीनुसार मंडळांचा पाऊस १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची मंडळे  :  १६२० १०० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची मंडळे     :   ११८ ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची मंडळे      :    १३६ ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची मंडळे       :   ९५ २५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची मंडळे       :   ९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com