गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील केळी ते येळी फाटा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरामुळे केळी गावाचा संर्पक तुटला.
हिंगोली जिल्ह्यातील केळी ते येळी फाटा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरामुळे केळी गावाचा संर्पक तुटला.

पुणे : विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सोमवारी (ता. २०) दमदार पाऊस पडला. या भागातील नद्या, नाले, ओढ्यांना पूर आले. गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला असून, पिके पाण्यात गेली आहेत. तर, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणे ओव्हरफ्लो झाली असून, धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा, सिंरोचा, भामरागडसह अनेक तालुके पुरामुळे प्रभावीत झाले असून, शेकडो गावांचा तालुका, जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जोराच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. नद्या ओव्हरफ्लो झाल्याने पुराचे पाणी गावात शिरून अनेक गावांतील नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. गडचिरोलीतील मुलचेरा येथे १५७ मिलिमीटर, तर भामरागड १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम होता. मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान, सोमवारी (ता. २०) दुपारपर्यंत या तीन जिल्ह्यांतील अनेक भागांत संततधार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले भरून वाहिले. पुरामध्ये पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. हिंगोली जिल्‍ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव शिवारात सोमवारी (ता. २०) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे पिकामध्ये पाणी साचले. केळी ते येळी फाटा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरामुळे केळी गावांचा संर्पक तुटला. नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने, भंडारदारा, निळवंडे धरण भरले आहे. जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा जिल्‍ह्यात कोयना, धोम, कण्हेर, बलकवडी व उरमोडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सांगलीतील कसबेडिग्रज -मौजेडिग्रज बंधारा दुसऱ्यादा पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असून, धरणांतील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच आहे. साेमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग) : कोकण : अलिबाग ४९, पोयनड ६१, किहीम ४४, चरी ४७, रामरज ४५, करनाळा ४२, कर्जत ४३, नेरळ ५६, कडाव ४५, कळंब ५५, कशेले ५१, खालापूर चौक ४१, वौशी ५१, खोपोली ५२, पेण ५६, वशी ६६, निझामपूर ५५, रोहा ४७, वाहल ४१, सावर्डे ४४, असुर्डे ४८, भरणे ४२, धामनंद ४३, तळवली ४५, पाटपन्हाले ६६, मंडणगड ४३, देव्हरे ५०, खेडशी ४६, तरवल ४५, देवळी ४२, भांबेड ४२, विलवडे ४०, अंबोली ६०. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४०, पेठ ३०, माले ५१, मुठे ६८, भोेलावडे ३८, संगमनेर ३८, काले ६१, कार्ला ३४, लोणावळा ५७, शिवणे ३०, राजूर ३४, हेळवाक ६०, महाबळेश्‍वर ६४, तापोळा ६२, लामज ९९, बाजार ३३, भेडसगाव ३१, करंजफेन ७१, आंबा ८७, राधानगरी ४६, गगनबावडा ४६, साळवण ४२, चंदगड ३६, हेरे ३७. मराठवाडा : वाटूर २७, मंथा २०, ढोकसळ ३८, पांगरी ३२, औराद ३२, आंबूलगा २२, नांदेड शहर ४९, नांदेड ग्रामीण ५५, वजीराबाद ४६, तुप्पा ४२, वसरणी ५१, विष्णुपुरी ४४, लिंबगाव ४५, तरोडा ५६, बिलोली ४५, सगरोळी २७, अदमपूर ४५, लोहगाव ४२, मुखेड ३५, येवती २६, जाहूर ३४, चांडोळा ७०, मुक्रमाबाद २२, कंधार २२, कुरुळा २७, फुलवळ २३, पेठवडज ४०, उस्माननगर ४०, बारूळ ३८, कापसी ४६, सोनखेड ४८, शेवडी ३३, कलंबर ३४, हदगाव २७, तळणी २१, निवघा २९, तामसा २२, पिंपरखेड २४, आष्टी ३८, भोकर ३४, मोघाळी ७५, मातूळ ३३, किनी ३२, देगलूर ४६, खानापूर ५२, शहापूर ८०, मुदखेड ७५, मुगट ६८, बारड ६६, हिमायतनगर ३०, जवळगाव ३३, सरसम २८, धर्माबाद ७२, करखेली २५, जळकोट ३८, उमरी ७४, गोळेगाव ५०, सिंधी ६५, अर्धापूर ६६, दाभड ६३, मालेगाव ४२, बरबडा २४, कुंटूर ३६, नरसी २६, नायगाव ४०, माजंरम ३४, सांगवी म्हाळसा २०, बामणी २६, चारठाणा ३०, पूर्णा २९, कांतेश्‍वर २०, चुडवा ४४, डोंगरकडा २१, वारंगा २६, आंबा २६, हयातनगर २५, गिरगाव २१, हट्टा २०, कुरुंदा ३५. विदर्भ : सोनोशी ३०, अकोला ३४, घुसर ३०, बोरगावमंजू ४१, शिवणी ४३, सांगळूद ३१, बार्शीटाकळी ३७, महान ३१, पिंजर ३०, खेर्डा ३८, मुंगळा ३०, चिखलदरा ३७, दर्यापूर ४०, बोटोनी ३२, घाटंजी ३३, साखरा ३४, हुडकेश्‍वर ४३, मुसेवाडी ४०, उमरेड ७०, हेवंती ५२, मळेवाडा ४८, भिवापूर ३७, कारेगाव ६४, कुही ३१, तितूर ४१, कान्हाळगाव ७२, केशोरी ३०, चंद्रपूर ३१, चांदनखेडा ३२, विहाड ३१, गडचिरोली ४४, येवळी ४२, चामोर्शी ३७, कुंघाडा ६३, घोट ४६, आष्टी ३६, सिरोंचा ५२, बामणी ६८, पेंटीपका ५२, असारळी ३७, जिमलगट्टा ८५, अल्लापाल्ली ४५, पेरमिली ३५, एटापल्ली ४४, कासंसूर ३९, जरावंडी ३५, गाट्टा ३५, धानोरा ३९, चाटेगाव ५६, पेंढरी ४५, कोटगुळ ३५, मुलचेरा १५७, तरडगाव ६१, भामरागड १९०. तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पाऊस स.िक्रय झाला अाहे. आज (ता. २१) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर, उद्यापासून (ता. २२) पावसाचा जोर पुन्हा ओसरणार असून, कोकण अनेक ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com