नागपूर, गडचिरोलीत संततधार

गडचिरोलीत पाऊस
गडचिरोलीत पाऊस

नागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (ता.१६) व मंगळवारी (ता.१७) अतिवृष्टीचा इशारा दिला. परंतु नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात रविवारी (ता.१५) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यात नदीला पूर आल्याने १५० गावांचा संपर्क तुटला आहे.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १३ जुलैपर्यंत सरासरी ४३२ मिमी पाऊस अपेक्षित होता. परंतु ४२४.७० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सरासरीपेक्षा ५ टक्‍के अधिक पाऊस गडचिरोलीत झाला.

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून, रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्‍यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे दीडशेपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी मार्गावरील अनेक वस्त्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नागपूर शहरात रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाले तुंबले असून, अनेक भागांत पावसाचे पाणी शिरले. विधिमंडळाचा परिसरदेखील जलमय झाला. परिणामी, महापालिकेकडून नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com