agriculture news in Marathi, heavy rain in Gadchiroli, Maharashtra | Agrowon

गडचिरोलीत धुवाधार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पुणे : जवळपास तीन आठवडे उघडीप देणाऱ्या पावसाने शनिवारपासून (ता. ११) राज्यात पुनरागमन केले आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोलीत धुवाधार पाऊस पडला असून, भामरागड तालुक्यातील तरडगाव येथे येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर, तर भामरागड येथे २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि मराठवाड्याच्या नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे. 

पुणे : जवळपास तीन आठवडे उघडीप देणाऱ्या पावसाने शनिवारपासून (ता. ११) राज्यात पुनरागमन केले आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोलीत धुवाधार पाऊस पडला असून, भामरागड तालुक्यातील तरडगाव येथे येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर, तर भामरागड येथे २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि मराठवाड्याच्या नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे. 

राज्याच्या बहुतांशी भागात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिन्यातही हलक्या पावसाचा अपवाद वगळता तब्बल दोन आठवडे पावसाची दडी कायम आहे. शनिवारी सायंकाळनंतर पूर्व विदर्भासह राज्याच्या दक्षिण पट्ट्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील गडचिरोलीसह, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडला. 

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जाेरदार, तर रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या भागात पावसाचा जोर अधिक होता. सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी, तर पुणे, नाशिकमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार, तर लातूरसह लगतच्या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. 

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)
कोकण : कर्जत ३१, नेरळ ४७, कडाव ३०, कळंब ३५, खालापूर चौक ३२, वावशी ४८, कामर्ली ३७, बिरवडी ३४, करंजवडी ३०, नाटे ३२, खारवली ३२, चिपळूण ३५, मार्गताम्हाणे ५०, रामपूर ४०, वाहल ३१, सावर्डे ४३, कळकवणे ४२, शिरगांव ४२,  शिरशी ३३, अंबवली ४२, कुलवंडी ३१, भरणे ३६, पाटपन्हाले ४०, अबलोली ४८, मंडणगड ९५, म्हाप्रळ ९२, देव्हरे ९७, खेडशी ३९, तरवल ४०, कडवी ३६, फुणगुस ३२, कोंडगाव ४१, देवळी ३३, देवरूख ३०, माभले ३३, तेरहे ४८, राजापूर ३३, लांजा ३७, विलवडे ३१, शिरगाव ४२, फोंडा ४२, सांगवे ४०, नांदगाव ४५, तालवट ३१, जव्हार ४२, मोखडा ३२. 

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४९, घोटी ३३, धारगाव ४७, पेठ ३०, वेळुंजे ३१, शेंडी ६९, बामणोली ३९, हेळवाक ५२, महाबळेश्‍वर १०८, तापोळा ११८, लामज १३३, करंजफेन ४३, मलकापूर ३२, आंबा ७३, राधानगरी ६७, सरवडे ३०, आवळी ३७, कसबा ३८, गगनबावडा ५१, कडेगाव ५२, कराडवाडी ४५,  गवसे ४८, चंदगड ६४, नारंगवाडी ३५, तुर्केवाडी ३१, हेरे ५९.

मराठवाडा : उदगीर २०, मोघा २०, जळकोट २२, नांदेड शहर २२, नांदेड ग्रामीण २१, तरोडा २०, बिलोली ४५, सगरोळी ३५, कुंडलवाडी ३०, अदमपूर २८, लोहगाव ३०, मुखेड २५, जांब २०, येवती २२, जाहूर ३२, चांडोळा २५, बाऱ्हाळी २०, मुक्रमाबाद ३८, पेठवडज २३, कापसी २५, कलंबर २४, हदगाव २४, आष्टी ३०, भोकर ४०, मोघाळी २०, मातूळ ४१, किनी ३२, किनवट ६७, बोधडी ४०, जलधारा ३४, शिवणी ४३, मांडवी ५२, दहेली ४०, मुदखेड ३६, बारड ३५, हिमायतनगर २७, जवळगाव २२, सरसम २९, माहूर ३२, वाई ३८, सिंदखेड ४६, धर्माबाद ९६, करखेली ५५, जळकोट ४८, उमरी २८, गोळेगाव २०, अर्धापूर ३६, दाभड २९, कुंटूर २१, नरसी २२, नायगाव ३८, टेंभुर्णी २१. 

विदर्भ : कळगाव ४७, अर्णी ४२, लोनबेहल ३७, सावळी ४६, अंजनखेड ३८, राजूर ३२, भलार ३२, पुनवट ३५, शिंदोळा ६१, शिरपूर ३४, झारी झामनी ३५, खडकडोह ३५, मुकुटबन ५७, मथार्जून ३३, चालबराडी ३२, शिवरा ३६, पोहारा ३५, लाखनी ३५, घुगस ३६, राजूरा ५३, कोपर्णा ९८, गडचांदूर ७५. सावळी ३४, पाथरी ३८, विहाड ३६, बल्लारपूर ९०, जेवती ७४, पाटण ६९, गडचिरोली ८७, पोरळा ७०, येवळी ५५, ब्राह्मणी ४२, कुरखेडा ४३, पुराडा ४०, अरमोरी ६०, देऊळगाव ३७, पिसेवढथा ७५, वैरागड ७५, चामोर्शी ७५, कुंघाडा ४८, घोट ३८, आष्टी ३८, येनापूर ३७, सिरोंचा ९९, बामणी १३९, पेंटीपका १२७, असारळी ८६, आहेरी ६०, जिमलगट्टा १४७, अल्लापाल्ली ८०, पेरमिली ११०. एटापल्ली ७८, कासंसूर १२३, जरावंडी ७०, गाट्टा १२३, धानोरा १२०, मुरूमगाव ५२, चाटेगाव ८४, पेंढरी ७१, कोटगुळ. देसाईगंज ४७, शंकरपूर ५२, मुलचेरा ५७, तरडगाव २२६, भामरागड २०७.

भामरागड तालुक्‍यातील शंभर गावांचा संपर्क तुटला
पूर्व विदर्भातील भातपट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (ता. ११) रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी (ता. १२) दिवसभर सर्वदूर धो धो पाऊस कोसळत होता. भामरागड तालुक्‍यात पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड लगतच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत आहे. परिणामी भामगरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रविवारी सकाळपासून या पसिरातील शंभर गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. शहरी भागातही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. बाजारपेठेत पाणी शिरल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. या पावसामुळे अनेक दिवसांपासून खंड पडलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

तरडगाव येथे अतिवृष्टी
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तरडगाव येथे २२६ मिमी, तर भामरागड येथे २०७ मिलिमीटरची नोंद झाली. सिरोंचा तालुक्यातील बामणी, पेंटीपका, आहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, पेरमिली, एटापल्ली तालुक्यांतील कासंसूर, गाट्टा आणि धानोरा, तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, लामज, तापोळा येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...