कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस

पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरात अनेक ठिकाणी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १७) कोकण, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही देण्यात आला आहे.  ओडिशा आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्यास सुरवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा दणका सुरूच आहे. बुधवारपर्यंत केरळ, कर्नाटक, घाटमाथ्यावर पाऊस आणखी वाढणार आहे. मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पाऊस वाढणार असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता अाहे. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्र खवळणार असून, मासेमरीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे १२७ मिलिमीटर सिंधुदुर्गमधील आंबोली येथे १०५ मिमी, तर सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे १४७ मिमी आणि लामज येथे १५३ मिमी पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठा वाढत असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्गही करण्यात येत आहे. तर पूर्व विदर्भातही मध्य स्वरुपाचा पाऊस झाला असून, पश्‍चिम विदर्भासह, मराठवाड्यात हलक्या पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  साेमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : कोकण : खालापूर चौक ४३, पेण ६०, हमरापूर ४०, खामगाव ४०, खेर्डी ४६, मार्गताम्हाणे ४५, रामपूर ६५, कळकवणे ६५, शिरगांव ५७, दापोली ४९, बुरोंडी ५२, दाभोळ ५९, अंजर्ला ५१, वाकवली ६३, पालगड ४७, वेळवी ४९, खेड ४४, कुलवंडी ५१, भरणे ४८, दाभील ४५, तळवली ४९, मंडणगड ४५, देव्हरे ६३, खेडशी ४३, कोंडगाव ५४, देवरुख ४०, तुलसानी ४३, राजापूर १२७, कोंडिया ६०, ओणी ४९, भांबेड ५९, पुनस ३८, विलवडे ६०, देवगड ५४, शिरगाव ६१, बांदा ४५, अंबोली १०५, भेडशी ४२. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३०, त्र्यंबकेश्‍वर ४०, शेंडी ५९, पौड ३१, घोटावडे ३२, माले ५६, मुठे ८१, पिरंगुट ३०, भोलावडे ४२, काले ६९, लोणावळा ६४, वेल्हा ४३, पानशेत ३९, राजूर ४७, आपटाळे ३५, सातारा ४३, खेड ३९, केळघर ४४, हेळवाक ७५, मरळी ३९, मोरगिरी ३१, महाबळेश्‍वर ७९, तापोळा १४७, लामज १५३, वाडी-रत्नागिरी ३३, कळे ४१, बाजार ५२, करंजफेन ६७, मलकापूर ३१, आंबा ८३, राधानगरी ६०, सरवडे ३५, आवळी ३४, राशिवडे ३८, कसबा ४३, गगनबावडा ४८, साळवण ९२, शिरोली-दुमाला ४०, खडकेवाडा ३०, मुरगुड ३८, पिंपळगाव ३३, कडेगाव ४८, कराडवाडी ५८, गवसे ४८, चंदगड ६४, नारंगवाडी ३५, तुर्केवाडी ३१, हेरे ५९. मराठवाडा : मोघाळी ४०, मरखेल २०, वानोळा २०. विदर्भ : मेटिखेडा २१, पाटणबोरी २०, तेलकामठी २२, गंगाझारी २४, काट्टीपूर ४९, आमगाव ३२, कवरबांध २५, सालकेसा ३८, मूल २७, बेंबळ २५, कोपर्णा २२, सावळी २९, पाथरी ३०, विहाड ३१, देऊळगाव २८, चामोर्शी ४४, कुंघाडा २९, घोट ४२, बामणी २४, पेंटीपका २१, असारळी २१, एटापल्ली २०, कासंसूर ३२, जरावंडी ३१, गाट्टा २९, धानोरा २३, चाटेगाव २५, पेंढरी २२, मुलचेरा २०, भामरागड २०.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com