agriculture news in marathi, heavy rain in kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता. १८) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. राधानगरी धरणातून ७ हजार क्‍यूसेकहून अधिक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता. १८) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. राधानगरी धरणातून ७ हजार क्‍यूसेकहून अधिक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

दूधगंगा धरणातून सर्वाधिक ७५०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. घटप्रभा प्रकल्पातून प्रतिसेकंद ५ हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याचे पाटबंधारे विभागातून सागंण्यात आले. चिकोत्रा वगळता इतर सर्व प्रकल्प ९५ ते १०० टक्के इतके भरले आहे. चिकोत्रा धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्वेकडील तालुक्‍यात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. या तालुक्‍यांत शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या दोन दिवसांत धरणांमधून आणखी पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्‍यताही निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी दोन दिवसांपूर्वीच पात्राबाहेर पडले आहे. इतर नद्यांचे पाणीदेखील कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी(ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत ४० बंधारे पाण्याखाली गेले होते. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील तारळे, शिरगांव, हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे हे सहा बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, शिरगाव व खोची हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील सुळंबी, सुळकुड, सिद्धनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरूंबे हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड हा एक बंधारा पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील कळे हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली हे सहा बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे. कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आळते, पुनाळ तिरपन  हा तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर घटप्रभा नदीवरील पिळणी, कानडी सावर्डे, बिजूर भोगोती हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ५३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.) ः हातकणंगले ३.२५, शिरोळ १.२८, पन्हाळा ६.२९, शाहुवाडी ३५.८३, राधानगरी ४६.५०, करवीर १३.००,  कागल २१.८६, गडहिंग्लज १५.००, भुदरगड ३१.४०, आजरा ३६.०० व चंदगड २२.६६.

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...