उत्तर कोकणात जोरदार पाऊस

मुंबईत पाऊस
मुंबईत पाऊस

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रभर आणि सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यात रविवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सकाळच्या सुमारास कर्नाळाजवळ पूल खचल्याची घटना घडली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरांत पावसाने रविवारी रात्रीपासून चांगली हजेरी लावली. मुंबईतील परळ, हिंदमाता, भायखळा, किंग्ज सर्कल या सखल भागांत पाणी साचले आहे तर पावसामुळे शहरातील पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तीनही लाेहमार्गावरील वाहतूक उशिराने सुरू होती.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने रविवारी रात्रीपासूनच चांगलेच झोडपले आहे. वसई, विरार, नालासोपारा भागात जोरदार पाऊस झाला आहे. नालासोपाराच्या सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डोंबिवलीतही पावसाचा धडाका कायम होता.

रायगडमध्येही रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सकाळच्या सुमारास कर्नाळाजवळ पूल खचला. संततधार पाऊस आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईवरून गोव्याकडे आणि गोव्यावरून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत पावसाळ्यात झाडे कोसळण्याचे प्रकार सुरू झाले असून, रविवारी मेट्रो सिनेमाजवळ महात्मा गांधी रोड येथे आझाद मैदानाला लागून असलेले झाड कोसळले. या दुर्घटनेत एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील झाड कोसळून मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com