नागपूरात पावसाची तुफान बॅटिंग...

नागपूरात पावसाची तुफान बॅटिंग...
नागपूरात पावसाची तुफान बॅटिंग...

नागपूर : नागपुरात गुरुवारी (ता.५) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत.  मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचले आहे. 

नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. संततधार पावसामुळे अनेक वस्त्यात पाणी शिरले असून विधानभवन परिसरही पाण्याखाली गेला आहे.  सध्याही नागपुरात मुसळधार सुरुच आहे, सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तास कोसळल्यानंतर ११. ४५ पासुन पाऊस सध्या पाऊस सुरु आहे.

पश्चिम नागपूरातील प्रताप नगर, त्रिमूर्ती नगर, जयताळा, सुभाष नगर, परसोडी, खामला, जोगी नगर परिसरात पाणी तुंबले,  नरेंद्र नगर परिसरात वाहनांची गर्दी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

उत्तर नागपुरात नगरसेवकाच्या घरात पाणी शिरले आहे, तर चांभार नाला भरुन वाहत आहे. पश्चिम नागपुरात बर्डे ले आऊट, नागसेन सोसायटीतील घरात पाणी शिरले आहे. तसेच रामनगरमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाले. जाजोजागी पाणी साचल्याने नागपुरातील सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. नागपूरात पावसाची तुफान बॅटिंग... विधानभवन परिसर (Video : Sandeep Soni)

नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू असून कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विधिमंडळाला वीजपुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी उभारण्यात आलेल्या लाईटरूममध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.  

वीज गेल्याने विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी मोबाइलचे फ्लॅश लाईटचा आधार घेत आंदोलन करावे लागत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेधनंजय मुंडे यांनी अंधारातच बैठका घेत दिवसभराची रणनीती आखणे सुरू ठेवले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com