कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणातील पावसाने जोर धरला असून, शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत ढग जमा झाले होते, तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे तालुक्यात पावसाला सुरवात झाली होती. आज (ता.३०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.   सातारा जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) दुपारनंतर रात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर अधिक असल्याने ओढ्यांना पाणी आले. तसेच शेतात पाणी साचले. वाऱ्यामुळे ऊस आडवा झाला असून, पाणी साचल्याने काढणीला आलेली पिके भिजली. पुणे जिल्ह्यातही मेघगर्जना विजांसह पाऊस पडला. तर नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रब्बीच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. कोकणातील पेण येथे सर्वाधिक ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  शनिवार (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :  कोकण : भिवंडी २५, खारबाव २२, पोयनाड २७, किहीम ४६, सरळ २९, पोयंजे ६३, मोराबे ५८, खालापूर चौक ३८, पेण ११७, हमरापूर ३९, वशी ३६, कामर्ली २४, असुर्डे ३७, कळकवणे २७, शिरगाव २३, शिर्शी २०, भरणे २७, दाभील २५, कडवी ५३, फणसावणे ३१, कोंडगाव ३१, देवरूख २९, तुलासानी ४८, म्हाबळे २५, तेऱ्हे ४१, साैंडल २०, कोंडेया २५, कुंभवडे २४, भांबेड ६९, विलवडे ४७, पेंदूर २१, मसुरे २५, अचरा २०,  बांदा २३, कुडाळ २७, कडवळ २१, वालवल ३१, मानगाव ३९, वैभववाडी ५५, येडगाव ४४, भुइबावडा ७२. मध्य महाराष्ट्र : गिरनारे ४६, इगतपुरी २१, पेठ २५, नेवासा ३३, संगमनेर २८, विरगाव २९, समशेरपूर ४२, साकीरवाडी २०, राजूर २३, सुरेगाव २६, दहिगाव २७, श्रीरामपूर ३७, राहाता २२, चिंचवड २२, भोर २१, आंबवडे २७, वडगाव मावळ ३०, तळेगाव ३१, खडकाळा ३१, कुडे ३८, चाकण २२, परिंचे २८, सातारा २३, खेड २५, वर्ये ५५, आंबवडे ३४, दहिवड २३, परळी २१, अपशिंगे २७, बामणोली ३३, हेळवाक ४६, उब्रंज ३७, इंदोली २०, कोरेगाव ३३, शिरंबे २९, वाठार-किरोली २१, पुसेगाव ५०, मायणी ३०, मलवडी २४, गिरवी ३०, वाठार-नि २२, तरडगाव ३२, लामज २०, आष्टा ३७, भिलवडी ३०, अंकलखोप २७, नेवरी २०, शाळगाव ३१, शिरोळ २२, कसबा २५, गगनबावडा २३, गडहिंग्लज ३१, हलकर्णी ३३, नेसरी २६, गारगोटी २२, पिंपळगाव २९, कडेगाव ६२, कराडवाडी ५५, आजरा २७, गवसे ५६, मडिलगे २०, उत्तूर २०, चंदगड २८, नारंगवाडी २४, कोवाड ५४, हेरे ३७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com