उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा

काटोल, जि. नागपूर : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २१) जोरदार हजेरी लावली.
काटोल, जि. नागपूर : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २१) जोरदार हजेरी लावली.

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने बाष्प खेचून आणल्याने शुक्रवारी (ता. २१) सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. आज (ता. २२) उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला होता. नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात ढगाळ हवामानासह पावसाला सुरवात झाली होती. मध्य महाराष्ट्रात जळगाव, सांगली, पुण्यात ढग गोळा झाले होते. तर कोल्हापुरात जोरदार सरी पडल्या. ढगाळ हवामान, पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता अाहे.   शुक्रवारी (ता. २१) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : कृषी विभाग) :   कोकण : न्याहडी ३६, कर्जत ४५, कशेले ४४, कामरली ५९, पोलादपूर ३७, मार्गताम्हाणे ३०, रामपूर ३०, असुर्डे ६२, दाभील ३८, कडवी ५८, माखजन ४५, फणसावणे ३७, देवरुख ३०, तुलसानी ४२, तेरहे ८७, सावंतवाडी १००, कुडाळ ७६, कडूस ४९.  मध्य महाराष्ट्र : कुडे २२, वर्ये २४, आंबवडे ३०, जावळी २७, अानेवाडी २४, कुडाळ ३३, पाटण २६, बामणोली ३०, पाचवड २२, भुईज २४, संख २०, शिराळा २५, मांगले ३५, सागाव ४८, निगवे २१, गडहिंग्लज ६७, हलकर्णी ६२, महागाव ३७, नेसरी ८०, कोवाड ५२.  विदर्भ : चंद्रपूर २०, मूल २८, बेंबळ ३३, गोंडपिंपरी ५०, नावरगाव २०, शिंदेवाही २१, मोहाली २२, राजूरा २६, विरूर ३०, कोपर्णा २५, गडचांदूर २५, सावळी ३७, पाथरी ३५, विहाड ४०, बल्लारपूर ३८, पोंभुर्णा ३२, जेवती २९, पाटण २६, गडचिरोली ६२.२, पोरळा ५२.४, येवळी ४६.२, ब्राह्मणी २८, कुरखेडा २०, पिसेवढथा ३८, चामोर्शी ९३, कुंघाडा ७१, घोट ६२, आष्टी ७१, येनापूर ७४, सिरोंचा ५५, बामणी ४०, पेंटीपका ४०, असारळी २१, आहेरी ५३, अल्लापाल्ली ६२, पेरमिली ३८, धानोरा ३३, चाटेगाव ६३, मुलचेरा ५७, भामरागड खुर्द ३०, भामरागड ३२. ‘दाये’ चक्रीवादळ लगेच विरले बंगालच्या उपसागरात बुधवारी तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत गेली. गुरुवारी (ता. २०) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या प्रणालीचे ‘दाये’ चक्रीवादळात रूपांतर झाले. ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असलेले हे चक्रीवादळ रात्री साडेबारा वाजता ओडिशातील गोपाळपूरजवळ जमिनीवर आले. त्यानंतर मात्र हे चक्रीवादळ निवळण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता. २१) सकाळी त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले. वायव्येकडे सकरत असलेले हे कमी दाब क्षेत्र हळूहळू निवळून जाणार आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com