कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

पावसाची शक्यता
पावसाची शक्यता

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली. कोकणातही पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या दक्षिण भाग ते केरळ या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र केरळकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. उद्यापासून (ता.शनिवार) कोकण, मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज (शुक्रवार) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.  गेल्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत जोरदार, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमी दाबाचा प्रभाव कमी झाल्याने पावसाचा जोर ओसरल्याची स्थिती आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गुरुवारी (ता. १९ पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, विदर्भात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्याची नोंद झाली. उर्वरित भागात काही अंशी ढगाळ हवामान होते. तर अधूनमधून ऊन पडल्याचे चित्र होते. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरीही बरसत होत्या. अरबी समुद्र ते गुजरातचा दक्षिण भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीच्या दरम्यान आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडतील. गुरवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत ठाणे येथील गोरेगाव, रायगडमधील पाररोली, नेरळ, खोपोली, कळंब, रत्नागिरीतील शिरगाव, पटपन्हाले, अंबवली, दोभोल, सिंधुदुर्गमधील तालवट, सावंतवाडी, पालघरमधील तलसरी, डहाणू, मालयण, कसा, झरी येथे जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नाशिकमधील वेळुजे, पेठ, कोहोर, उमराळे येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नगरमधील शेडी येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील भोलावडे येथे सर्वाधिक १०३ मिलिमीटर पाऊस पडला असून मुठे, पिरंगूट, नसरापूर, आंबवडे, निगुडघर, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, साताऱ्यातील तापोळा येथे राज्यातील सर्वाधिक १२८.२ मिलिमीटर पाऊस पडला. तर हेळवाक, मरळी, मोरगिरी, कुठरे, महाबळेश्‍वर, कोल्हापूरातील करंजफेन, मलकापूर, आंबा, राधानगरी जोरदार पाऊस पडला. ----------------- कोकण विभाग ठाणे : मुंब्रा २०, बेलापूर २०, खर्डी २९, डोलखांब ३६, गोरेगाव ४४, कुमभर्ली २५, रायगड : पनवेल ३७.२, पवयंजे ३२, करनाळा ४०, मोराबी ३०, कर्जत ३८.४, नेरळ ५४.२, कडाव ४१, कळंब ५१, कशेले ४५, चौक ३१, वौशी २८, खोपोली ५३, उरण ३२, कापरोली ६०, जसइ ५१, पाली २०, आटोने २७, जांभूळपाडा १९,पेण २९, हमरापूर ४३.५, वाशी १९, कसू २३, कामरली ३६, महाड २४, बिरवडी २७, करंजवडी ३४, नाटे ३३, खारवली ३७, तुडली२९, माणगाव २६, गोरेगाव ३४, लोनेरे २३, निझामपूर २८, रोहा ३२, नागोठणे २१, चानेरा ३२, कोलाड ३७, कोंडवी ३९, वाकण २८, म्हसला ३६, खामगाव ४१.४, तला २२, मेंढा ३१ रत्नागिरी : चिपळूण २५, मरगतम्हाणे ३०, रामपूर २०, वाहल २५, सावरडे ३४, असुरडे ३५, कलकावणे ३८, शिरगांव ९५, दापोली २८, बुरवंडी २५, दाभोल ४७, अंजरला २३, वाकवली ४४, पालगड २५, वेलवी २६, खेड ३२, शिरशी २७, अंबवली ५२, कुलवंडी २०, भारने २८, दाभील २२, धामनंद २२, तलवली २८, पटपन्हाले ६५, अबलोली ३०, मंडणगड ३०, म्हाप्रल २६, देव्हरे ३५, खेडशी २२, टरवल ३५, पाली २३, कडवी २१, मुरडव ४५, माखजन २१, फुंगुस ३२, फनसावणे २३, अंगवली २४, कोडगाव ३२, देवली २२, देवरुख २४, तुलसानी ४१, माभले २५, तेरहे ३६, राजापूर ३०, सवंडल २७, कोंडीया २३, जैतापूर २८, कुमभवडे ३२, नाटे ३०, ओनी २३, पाचल ३२ पुनस ४२, सातवली ३८, विलवडे ३२ सिंधुदुर्ग ः पाटगाव २६, सावंतवाडी ३५, बांडा २४, आजगाव २७, शिरोडा २१, कनकवली २०, सांगवे ३५, तालवट ६६, भेडशी २२ पालघर ः वाडा २५, कोणे २७, डहाणू ४५.६, मालयण ४३.२, कसा ४६, चिंचणी ३६,जव्हार ३७, साखर ३०, मोखडा ३१.४, तलसरी ४७, झरी ४५, विक्रमगड २८, तलवड ३३ मध्य महाराष्ट्र ः नाशिक : सुरगाणा २०, उमराळे २९, धारगाव २२, पेठ ३८.२, कोहोर ३३.६, वेळुंजे ३५, हर्सूल २८.८ नगर : शेंडी ४५ पुणे : पौड २५, घोटावडे ३२, माले ३७, मुठे ६९, पिरंगुट २२, भोलावडे १०३, नसरापूर २०, आंबवडे ३४, निगुडघर ५९, काले २९, कार्ला ४२, खडकाळा २१, लोणावळा ६८, वेल्हा २६, पाणशेत २८, विंझर २१, आंबवणे २६, राजूर ३५, आपटाळे २५, सातारा : सातारा ३०, खेड २७, आंबवडे २७.३, दहिवड २८, परळी ३०, जावळीमेढा ३०, बामणोली ३९.२, केळघर ३५.६, पाटण २५, म्हावशी २१, हेळवाक ६५, मरळी ३७, मोरगिरी ६५, ढेबेवाडी २४, कुठरे २७, महाबळेश्‍वर ९०.५, तापोळा १२८.२, लामज १८ सांगली : चरण २२.७ कोल्हापूर ः बाजार ३५, कोतोली २३, करंजफेन ७२, मलकापूर ३६, आंबा ७९, राधानगरी ४१, राशिवडे २२, कसबा २४, गगनबावडा ४२, साळवण ५९, सांगरूळ ३७, बीड ३९, कडेगाव ३५, आजरा २२, गवसे ५६, चंदगड ३३, हेरे २५ विदर्भ ः गोंदिया : बोधगाव देवी २२ गडचिरोली ः पिसेवढथा २५.८, वैरागड २३.६,पेंटीपका २२, धानोरा ३२.६, मुरूमगाव ३८.६,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com