agriculture news in Marathi, heavy rain possibility in Kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाने आजपासून (ता. ११) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी (ता. १०) दुपारी औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली होती.

पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाने आजपासून (ता. ११) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी (ता. १०) दुपारी औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली होती.

आज (ता. ११) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाण्यासह मुंबईतही पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात आणि विदर्भातही तुळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पावसामुळे राज्याच्या तापमानातही चढ-उतार सुरू असून, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नागपूर, वर्धा आणि जळगाव येथे तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. उर्वरित राज्यात तापमानात थोडीची घट झाली आहे. विदर्भात कमाल तापमान ४० ते ४५ अंश, मराठवाड्यात ४० ते ४१ अंश, मध्य महाराष्ट्रात २७ ते ४४ अंश आणि कोकणात ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. 

सोमवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७ (४.०), जळगाव ४४.० (३.६), कोल्हापूर ३५.६(३.८), महाबळेश्वर २७.५ (१.९), मालेगाव ४३.२ (५.९), नाशिक ३७.८ (२.३), सांगली ३६.० (२.५), सातारा ३५.२ (३.०), सोलापूर ३८.५ (१.७), अलिबाग ३६.८ (४.३), डहाणू ३६.० (१.७), सांताक्रूझ ३६.८ (४.३), रत्नागिरी ३३.२ (१.६), औरंगाबाद ४०.० (३.२), परभणी ४०.६ (१.३), नांदेड ४१.५ (२.३), अकोला ४०.३ (०.३), अमरावती ४२.८ (३.५), बुलडाणा ४१.४ (५.२), चंद्रपूर ४४.८ (३.७), गोंदिया ४३.०(२.४), नागपूर ४४.६ (३.७), वर्धा ४४.५ (४.२), यवतमाळ ४२.०(२.६). 

इतर अॅग्रो विशेष
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः...पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा...
खत आयातीत हेराफेरीपुणे : शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या नावाखाली...
शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला; पण पीकविमा...सोलापूर ः पीकविम्याच्या विषयावर सातत्याने...
मराठवाड्यातील उद्ध्वस्त बागा...औरंगाबाद ः सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
आयात खाद्यतेलावर १० टक्के विकासकर लावाः...लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर...
कापसावरील टोळधाडीने पाकिस्तान धास्तावलासिंध, पाकिस्तान:  पाकिस्थानातील कापूस पीक...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...