पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय झाल्याने राज्यात सोमवारपर्यंत (ता. २३) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २२) विदर्भात अतिवृष्टी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.   शुक्रवारी (ता. २०) बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. त्याची तीव्रता शनिवारी वाढून हे क्षेत्र ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत होते. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीमध्ये आहे, त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान आहे. शनिवारी ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश, छत्तीसगडमध्ये ढगांची दाटी झाली होती, तर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढग जमा होत होते. शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भ, मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या.  शनिवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) :  कोकण : कर्जत ७९, नेरळ ९२, कडाव ८०, कळंब ८९, कशेळे ८५, कोप्रोळी ७१, हमारपूर ७५, वाकण ८४, विलवडे ७२, अंबोली ८०, साईवन ८९, कसा ८९, जव्हार १४७, साखर १६८, मोखडा १०५, तळवडा ११५. मध्य महाराष्ट्र : नाणशी ५८, इगतपुरी ७५, घोटी ५२, धारगाव ८०, पेठ ६८, जागमोडी ५०, वेळुंजे १११, हर्सूल ५४, विसरवाडी ७०, अक्कलकुवा ९८, खापर ९९, मोरांबा ६७, दाब ६१, मोलगी ५५, वडफळी ६४, शेंडी ८९, माले ५४, मुठे ६९, भोलावडे ८०, कार्ला ८६, लोणावळा १४७, राजूर ६५, अापटाळे ३५, हेळवाक ५५, महाबळेश्‍वर ८१, तापोळा ९८, लामज १४५, आंबा ५९, राधानगरी ५१, साळवण ६७, गवसे ६४. मराठवाडा : उस्मानपुरा ५८, वागरूळ २७, गोंधी २१, शृष्टी ३३, सातोणा २२, घनसांगवी २५, जांबसमर्थ २१, लिंबगाव २२,  बिलोली २०, सगरोळी २४, अदमपूर २७, मुखेड २६, येवती २५, जाहूर २६, चांडोळा ३४, पेठवडज ४२, किनी २७, मालेगाव २८, पूर्णा २१, चुडवा २१, सेलू २१, जवळा २०. विदर्भ : खेर्डा २४, इंझोरी २०, पांढरकवडा २०, पाहापळ २०, चालबराडी २०, कोपर्णा २२, सिरोंचा ४०, बामणी २७, पेंटीपका २६, असारळी २९, जिमलगट्टा ७८, कासंसूर ३८, तरडगाव ३६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com