agriculture news in marathi, heavy rain prediction in vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. या भागात चक्रिवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे राज्यात पाऊस जोर वाढणार असून आज (ता. २१) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. या भागात चक्रिवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे राज्यात पाऊस जोर वाढणार असून आज (ता. २१) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

येत्या सोमवार (ता. २४) पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. 

आंध्रप्रदेशातील कालिगपटनमपासून नैऋत्य दिशेच्या बाजूला सुमारे ३१० किलोमीटर, ओडिशातील गोपाळपूरपासून तीनशे किलोमीटर अंतरावर चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक होणार वाढणार आहे. हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या बाजूला सरकेल. या चक्रीवादळाचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर आहे. 

आज या चक्रीवादळाचा वेग वाढत जाऊन ८० किलोमीटर होईल. तसेच मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशाचा पूर्व भागातही समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर अंतरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार तयार झाले आहे.  
 
कोकणातील भिरा, वेंगुर्ला येथे गुरुवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत हलक्या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रातील शिरूर, पुणे शहर, साक्री, सांगोला, कवठे महाकाळ, ओझर, कर्जत, मिरज, सांगली, तळोदा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील आष्टी, गेवराई, नायगाव, खैरगाव, पैठण, सोनपेठ, तुळजापूर येथेही हलका पाऊस पडला. विदर्भातील अकोला, ब्रम्हपुरी येथे पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या असून उर्वरित भागात काही अंशी ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील अनेक भागात अधूनमधून ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. पावसामुळे सुकत असलेल्या पिकांना काही अंशी दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहे. 

गुरुवारी (ता. २० ) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस ( मिलिमीटरमध्ये) ः
कोकण ः भिरा, वेंगुर्ला १० 
मध्य महाराष्ट्र ः शिरूर ७०, साक्री ६०, सांगोला ४०, कवठेमहाकाळ, ओझर, पारनेर २०, कर्जत, मिरज, सांगली, तळोदा १० 
मराठवाडा ः आष्टी ३०, गेवराई, नायगाव, खैरगाव २०, पैठण, सोनपेठ, तुळजापूर १०
विदर्भ ः अकोला, ब्रम्हपुरी १०

 

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...