agriculture news in marathi, heavy rain in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील मावळ पट्ट्यात जोरदार पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या मावळ पट्ट्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. उर्वरीत भागातही हलका ते मध्यम   स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुळशी तालुक्यातील माले येथे सर्वाधिक ९३ तर मावळ तालुक्यातील लोणावळा येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागात भात रोपे वाढीच्या अवस्थेत असून, पावसामुळे चिखलणीच्या कामांना वेग येणार आहे. इतर भागात खरिपातील सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका आदी पिकांच्या पेरण्या सुरू होणार आहेत.

पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या मावळ पट्ट्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. उर्वरीत भागातही हलका ते मध्यम   स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुळशी तालुक्यातील माले येथे सर्वाधिक ९३ तर मावळ तालुक्यातील लोणावळा येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागात भात रोपे वाढीच्या अवस्थेत असून, पावसामुळे चिखलणीच्या कामांना वेग येणार आहे. इतर भागात खरिपातील सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका आदी पिकांच्या पेरण्या सुरू होणार आहेत.

मंगळवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांच्या पश्‍चिमेकडील भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. सोमवारी रात्री पाऊस वाढला होता. पश्‍चिम भागातील पावसाचा जोर पूर्वेकडे कमी होत गेला. शिरूर, बारामती, पुरंदर, इंदापूर, हवेली तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. मंगळवारी सकाळपासून ऊन सावल्यांच्या खेळाबरोबरच पावसाच्या सरीवर सरी येत होत्या.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : माले ९३, मुठे ६०, पिरंगुट ७९, भोलावडे ७२, संगमनेर ३१, निगुडघर ६२, काले ६१, कार्ला ७२, खडकाळा ४८, लोणावळा ९१, वेल्हा ५८, पानशेत ६६, विंझर ४१, अंभवणे ३१, राजूर ३४, डिंगोरे ४६, कुडे ४५, पाईट ३०, आंबेगाव ५१.

जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणांमध्ये पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये टेमघर येथे उच्चांकी ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. उजनी विसापूर वगळता सर्वच धरणक्षेत्रांमध्ये हलक्या ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : टेमघर ११०, वरसगाव ७३, पानशेत ६६, खडकवासला १७, पवना ६१, कासारसाई १३, मुळशी ९३, कलमोडी ४५, चासकमान ८, भामा असखेड २९, आंद्रा २५, वडीवळे ६७, गुंजवणी ५९, भाटघर १४, निरा देवघर ६२, वीर ३, नाझरे ४, पिंपळगाव जोगे ३९, माणिकडोह ३०, येडगाव १६, वडज १५, डिंभे ५४, घोड ५.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...