तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

हवामान
हवामान

पुणे  : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात आज (ता. २९) अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उद्यापासून (ता.३०) राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडापासून बंगालच्या उपसागरापर्यंत स.िक्रय आहे. तर, १ सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये समुद्रसपाटीपासून ३.६ ते ५.८ किलोमीटर उंचीवर वाऱ्यांचे पूर्वपश्‍चिम जोडक्षेत्र असल्याने आज (ता. २९) राज्यात पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.   मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंत पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले होते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) :  कोकण : सावर्डे ४९, असुर्डे ५०, कळकवणे ६५, शिरगांव ९६, अंजर्ला ४१, वाकवली ८६, मंडणगड ६०, म्हाप्रळ ५१, देव्हरे ६१, अंगवली ५८, देवरुख ४३, राजापूर ४४, सवंडल ५२, कोंडीया ६७, जैतापूर ४४, कुंभवडे ४१, विलवडे ६२, श्रावण ६५, आचरा ६३, अंबेरी ४३, आजगाव ७१, अंबोली १३५, कनकवली ५४, फोंडा ४८, सांगवे ४७, वागडे ४६, कसाल ४७, मानगाव ५६.  मध्य महाराष्ट्र : भोलावडे ३५, मोरगिरी ३२, महाबळेश्‍वर ४२, तापोळा ७२, लामज ८४, मिरज ३७, बहे ३१, कळे ३१, करंजफेन ३८, आंबा ५६,  राधानगरी ३६, आवळी ३४, कसबा ३२, गगनबावडा ७८, साळवण ६५, सिद्धनेर्ली ३१, केनवडे ४९, पिंपळगाव ३३, कडेगाव ५०, कराडवाडी ४५, आजरा ३४, गवसे ६४, मडिलगे ३३, चंदगड ५८, नारंगवाडी ३८. विदर्भ : निमखेडा ३१, खाट ३१, कुही ३६, राजोली ३२, शहापूर ४४, भंडारा ३१, धारगाव ४२, बेला ३३, पाहेला ३६, खामारी ३८, मोहाडी ५१, वार्थी ४९, करडी ५०, केंद्री ४४, कान्हाळगाव ६०, आंधळगाव ६८, नाकडोंगरी ६७, तुमसर ५४, शिवरा ४५, मिटेवणी ५१, गाऱ्हा ८३, आकोडी ४९, लाखनी ४४, पिंपळगाव ३७, गंगाझरी ४७, रत्नारा ४२, दासगाव ६३, रावणवाडी ५०, गोंदिया ४५, कामठा ९६, काट्टीपूर ६३, आमगाव ५०, तिगाव ५०, ठाणा ६९, परसवाडा ६६, तिरोडा १०३, मुंडीकोटा ७०, वाडेगाव ६९, ठाणेगाव ८३, गोरेगाव ७०, कुऱ्हाडी ७५, मोहाडी ४३, सालकेसा ५०, शिखारीटोळा ४७, मुल्ला ३४, चिंचगड ३२, दारव्हा ३७, चामोर्शी ३०, मुरूमगाव ५१, पेंढरी ४८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com