agriculture news in marathi, Heavy rain for the third consecutive day in Satara | Agrowon

साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

सातारा ः जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्याने यामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सरासरी २२.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सातारा ः जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्याने यामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सरासरी २२.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात बहुतांशी भागात रविवारपासून पावसाने जोरदार आगमन केले आहे. सोमवारी जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी दोन ते तीन तास सलग पाऊस झाला. अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच अनेक शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे. ओढ्यासह नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत.

काढणीला आलेल्या पिके भिजत असल्याने शेतकऱ्यांना काळजी वाढली आहे. वादळी वाऱ्यामुळे उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आडवे झाले आहे. ऊस तुटण्यास उशीर झाल्यास उंदिराचा उपद्रव वाढणार आहे. मंगळवारी पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यातही अनेक भागांत पाऊस झाला आहे. काढणीला आलेल्या खरीप पिकांसाठी हा पाऊस नुकासानकारक असलातरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.  

किकली परिसरात गारांसह पाऊस सोमवारी वाई तालुक्यात किकली परिसरात सोमवारी गारांसह जोरदार पाऊस झाला आहे. या गारामुळे हळद पिकांची पाने फाटून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे. सातारा- २०.८८, जावळी- ४६.६०, पाटण- ११.००, कऱ्हाड- १४.२३, कोरेगाव- १८.८०, खटाव- २६.५९, माण- २३.२९, फलटण-२३.४४, खंडाळा- ३०.२५, वाई-३०.१४, महाबळेश्र्वर- ३५.१३.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...