agriculture news in Marathi, heavy rain in Vidarbha and Marathwada, Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन दिवस विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने धूमशान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकांचे, तसेच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाने पुरती दाणादाण उडाली असून, नदीकाठच्या गावांना पुराने वेढा दिल्याने नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. नांदेड, नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पावसाने नद्या, नाल्यांना पूर येऊन पिकांना जबर फटका बसला अाहे. आजपासून (ता.

पुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन दिवस विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने धूमशान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकांचे, तसेच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाने पुरती दाणादाण उडाली असून, नदीकाठच्या गावांना पुराने वेढा दिल्याने नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. नांदेड, नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पावसाने नद्या, नाल्यांना पूर येऊन पिकांना जबर फटका बसला अाहे. आजपासून (ता. १८) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे.

 यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस तालुक्‍यांतून वाहणाऱ्या अरुणावती नदीचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांमधील तब्बल एक हजारांवर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलोरा या गावाला पुराचा विळखा बसला. मोरणा व धावंडा या दोन नद्यांना पूर आला. धानोरा येथील बाजीराव डेरे पुरात वाहून गेले. दिग्रस तालुक्‍यातील २२ जनावरांचा पूरस्थितीमुळे मृत्यू झाला. दारव्हा तालुक्‍यातील तेलगव्हाण येथे पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

दिग्रस तालुक्‍यात विठाळी, वरंदळी, कांळदी, बेलोरा, हरसूल, कलगाव, रोहणा देवी, चीजकुटा या भागात पुराच्या पाण्यामुळे घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. वऱ्हाडात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पावसाने तडाखेबंद पुनरागमन केले आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील निम्म्याहून अधिक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे बहुतांश नदी, नाले वाहते झाले. मोरणा, आमना, निर्गुणा, काटेपूर्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेतशिवारांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे मूग, उडीद व सोयाबीन, कपाशी, तूर या प्रमुख पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रालाही पावसाने झोडपून काढले असून, अतिवृष्टी झाल्याने नवापूर (जि. नंदूरबार) तालुक्‍यातील उंचीशेवडी येथील बंधारा फुटला. त्यात विसरवाडी, बरडीपाडा व बालाट या गावांमध्ये पाणी शिरून पशुधन मृत्युमुखी पडले. तर नाल्याला मोठा पूर आला. विसरवाडी, बालाट व बरडीपाडा या गावांमध्ये पाण्याच्या तडाख्यात सापडल्याने म्हशी व शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. नवापाडा, कुंभारपाडा या गावांमध्येही शेतीचे मोठे नुकसान झाले.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे इसापूर, विष्णुपुरी, निम्न मनार प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पांचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. पूर्णा, दुधना, पैनगंगा, गोदावरी या प्रमुख नद्यांसह ओढे, नाल्यांना पूर लोटले. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला. माहूर तालुक्यातील पुराचे पाणी पिकांमध्ये शिरल्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

परभणी जिल्ह्यात दुधना, पूर्णा, करपरा नद्यांना पूर आला.  
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून सुमारे ५० हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरल्याने खडकवासला, वरसगाव, पानेशत, डिंभे, चासकमान, मुळशी, नीरा देवघर, वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.

भीमेच्या खोऱ्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसामुळे भंडारदरा धरण भरले असून, निळवंडे धरण भरण्याच्या मार्गावर आहे, मुळा धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. 
सांगली जिल्‍ह्यातील चांदोली धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. चांदोली धरण ९७ टक्के भरले आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : कोकण : नेरळ ८७, कळंब ६७, कशेले ५०, वौशी ५२, आटोने ८१, महाड ४७, बिरवडी ५६, नाटे ५१, खारवली ५१, शिरगाव ५३, आजगाव ७३, तालवट ७८, भेडशी ९१. मध्य महाराष्ट्र : मालेगाव ६४, वडनेर ६३, जैखेडा ६०, डांगसौदाणे ६०, मुल्हेर ६४, कानशी ७४, दालवत ७०, अभोणा ७४, मनमाड ७१, वेहेलगाव ७३, जातेगाव ६९, बाऱ्हे ७८, बोरगाव १०२, मानखेड १२७, नाणशी ८०, कोशिंबे ६६, इगतपुरी ६५, पेठ १०१, लासलगाव ६१, आंदरसूळ ६२, जळगाव ६०, वेळुंजे ८०, धुळे शहर ९८, शिरूड ६६, बोरकुंड ७६, आर्वी ७१, सोनगीर १३६, नगाव १२०, मुकटी ६१, धुळे खेड १८६, कुसुंबा १९१, नेर १३३, कुडाशी १५०, उमरपट्टा २३१, दहिवेल १०७, शिरपूर ९३, बोराडी ७५, चिमठाणा १०६, शेवडे ९६, खलाणे ९२, नरडाणे १००, वर्शी ९०, नवापूर १४०, नवागाव ९०, चिंचपाडा १९२, विसरवाडी २३५, खांडबारा ६४, असलोद ६०, रोशणमाळ १०२, खुंटामोडी ९८, दाब ८२, मोलगी ७३, सावेडी ६५, भिंगार ६१, नागापूर ९४, टाकळी ६५, कुकाणा ६०, चांदा ६०, घोडेगाव ६१, सोनई ६३, वडाळा ६५, राहूरी ६१, ब्राह्मणी ७२, कोपरगाव ६४, रवांदे ८०, सुरेगाव ७६, श्रीरामपूर ६८, बेलापूर ७२, उंदीरगाव ७०, टाकळीभान ७१, राहाता ६३, लोणी ६०, पुणतांबा ६६, लोणावळा ११७, राजूर २१०, आपटाळे ९५, आंबेगाव ६६, हेळवाक ९०, महाबळेश्‍वर १६३, तापोळा १७४, लामज १८९, आंबा ९३, गवसे ६४.

मराठवाडा : औरंगाबाद १५८, उस्मानपुरा १५६, भवसिंगपुरा १८२, कांचनवाडी १५६, चिखलठाण १४५, चित्तेपिंपळगाव ११६, करमाड १३९, लाडसावंगी १४०,  चोवका १५८, आडूळ ११५, पिंपळवाडी ११५, बाळानगर ९६, नांदूर ९७, लोहगाव १०८, ढोरकीन ११०, बीडकीन १०४, पैठण ९४, पाचोड १०४, तुर्काबाद ९५, वैजापूर १०६, खंडाळा ९५, बोरसर ९०, महालगाव १०२, देवगाव १६१, चिखलठाणा १९२, नाचणवेल ११८, चिंचोली १२०, करंजखेड २०४, सुल्तानपूर ११०, बाजार २१७, सिल्लोड १००, आंभाई १२०, सावळदबारा ९०, बनोटी ८०, फुलांब्री १४७, आलंद ९०, फिरबावडा १२१, वाडोदबाजार १०५, भोकरदन ९९, हसनाबाद १४५, राजूर १४५, केदारखेडा १५६, जाफराबाद १४०, कुंभारझरी १०२, जालना शहर १४६, जालना ग्रामीण ९९, वागरूळ १८०, नेर ९५, शेवळी ९१, विरेगाव १४०, रामनगर १५५, पांचवडगाव १५५, परतूर १३०, आष्टी १२८, शृष्टी २११, सातोणा १४३, बदनापूर ११३, शेळगाव १४५, बावने १४०, रोशणगाव १४६,  घनसांगवी १२७, तीर्थापुरी ११३, कु. पिंपळगाव १०५, अंतरवळी ९३, रांजणी १९०, मंथा १३४, तलाणी ११५, ढोकसळ ११५, पांगरी १२५, माजलगाव ९०, गांगामासळा ११०, कित्तीडगाव ९५, नांदेड शहर ११८, नांदेड ग्रामीण १२४, वैजापूर १०६, वजीराबाद १०६, तुप्पा १०४, वसरणी ११०, विष्णुपुरी १००, लिंबगाव १२१, तरोडा १२५, हदगाव ९९, तळणी ९६, निवघा ९४, पिंपरखेड ९६, किनवट १९५, बोधडी ११९, इस्लापूर १०३, जलधारा ९२, शिवणी ११३, मांडवी १३२, दहेली १७९, बारड ९१, हिमायतनगर ११३, माहूर १९०, वानोळा १६३, वाई २३२, सिंदखेड १६७, दाभड १२२, मालेगाव ११५, पाथरी १४२, जिंतूर १०४, सांगवी म्हाळसा ९४, बामणी १२४, पूर्णा १०४, सेलू १३७, चिकलठाणा १०८, सोनपेठ ९४, आवलगाव १३३, सिरसम ९०, नांदापूर ९२, आखाडा बाळापूर ९३, डोंगरकडा ९५, औंढा १०५.

विदर्भ : बुलडाणा : आसलगाव १०४, कोलारा १०३, शेलगाव १३०, बुलडाणा १३०, धाड १४४, पाडळी १५१, म्हसला १२९, देऊळघाट १६९, देऊळगाव राजा शहर १६३, देऊळगाव राजा ग्रामीण १२५, तुळजापूर १२५, डोणगाव १०२, अंजनी १०५, सिंदखेड राजा १२६, किनगाव १२६, सोनोशी ११३, मलकापूर १३३, जांभूळधाबा १२०, मोताळा १२०, धामनगाव ११४, रोहिणखेड १०८, निंबा ११९, पातूर १०८, आलेगाव ११३, सस्ती ११४, कापशी १०९, बोरगावमंजू १०५, शिवणी १०२, पळसो १०६, सांगळूद ११०, करणखेड १२०, बार्शीटाकळी १९४, महान १४०, राजंदा १८०, दाभा १५२, पिंजर १४५, खेर्डा १४१, मूर्तिजापूर १२२, निंबा १४०, वाशीम ११०, अनसिंग १२८, किन्हीराजा १००, मंगरुळपीर १०९, अासेगाव ११२, धानोरा ११०, मानोरा १४६, इंझोरी १५०, शेंदूर्जन १३४, उमरी १३०, कारंजालाड १४५, उंबरडा ११०, कामरगाव १६५, खेर्डा १२०, पोहा १४०, येवता १५५, सावळीखेडा १०८, दारव्हा १३२, मांगकिन्ही १३२, दिग्रज २१६, कळगाव १०६, तूप १२१, अर्णी १६८, अंजनखेड १६५, पुसद १०९, शेंबळ ११५, खंडाळा १४४, ब्राह्मणगाव १२२, जांब ११५, वरूड १०७, बिटरगाव १०५, दारटी ११६, मोहगाव १०८, गुंज १०३, कळी १०७.

सोमवारपासून विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज
पावसाने दणका दिल्यानंतर राज्यात सक्रिय कमी दाबक्षेत्राची तीव्रता आसरल्याने शुक्रवारी (ता. १७) बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली होती. आजपासून (ता. १८) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता अाहे. बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. १९) नवीन कमी दाबक्षेत्राचे संकेत असून, सोमवारपासून (ता. २०) कोकणासह विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :
उमरपट्टा २३१ (धुळे), विसरवाडी २३५ (नंदूरबार), राजूर २१० (पुणे), करंजखेड २०४, बाजार २१७ (औरंगाबाद), शृष्टी २११ (जालना), वाई २३२ (नांदेड), दिग्रज २१६ (यवतमाळ). 

पावसाचा जोर

  • यवतमाळ जिल्ह्यात गावांना पुराचा वेढा नागरिकांचे स्थलांतर,  नांदेड जिल्ह्यात नद्यांना पूर, पिकांना जबर फटका
  • नंदूरबार जिल्ह्यात पुरामुळे पशुधनाचे नुकसान कोयनेतून ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
  • उजनीच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ
  • भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, निळवंडे रण्याच्या मार्गावर

इतर अॅग्रो विशेष
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...