agriculture news in marathi, Heavy rain in the warhad | Agrowon

वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

अकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या २४ तासांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. वीज पडून बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत तीन जनावरे दगावली. अकोला जिल्हयात बार्शीटाकळी तालुक्यात प्रामुख्याने महान परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तुरीचे पीक जमिनीवर आडवे झाले.

अकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या २४ तासांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. वीज पडून बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत तीन जनावरे दगावली. अकोला जिल्हयात बार्शीटाकळी तालुक्यात प्रामुख्याने महान परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तुरीचे पीक जमिनीवर आडवे झाले.

अनेक भागात सोमवारी (ता.१९) दुपारी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री थोडी उसंत घेतल्यानंतर मंगळवारी (ता.२०) पुन्हा पहाटेपासून पाऊस सुरु झाला. सकाळी अाठ वाजेपर्यंत अकोला, वाशीम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची रिमझिम सुरु होती. काही ठिकाणी पावसाच्या सरींमध्ये जोरही होता. 

सोमवारी कामासाठी शेतात गेलेल्या माेताळा तालुक्यातील माळेगाव येथील दीपाली विजय भंगाळे (वय ३५) या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेतातील काम अाटोपून त्या घराकडे परतत येत असताना ही दुर्घटना घडली. खामगाव तालुक्यातील लोखंडा येथे वीज पडून तीन जनावरे ठार झाली. बार्शीटाकळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तुरीचे पीक जमीनदोस्त झाले. कांदा, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले.   

मंगळवारी सकाळपर्यंत बुलडाणा मंडळात ३५, देऊळघाट मंडळात ३२, शेगाव मंडळात ३६, माटरगाव मंडळात २६, जलंब मंडळ २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक २० मिलीमीटर पाऊस झाला. चिखली तालुक्यात २३, शेगावमध्ये १९, बुलडाण्यात १८.७, नांदुरा येथे ११.८ मिलीमीटर पाऊस झाला.  हा पाऊस हरभरा, कोरडवाहू कापूस या पिकांसाठी दिलासा देणारा ठरला अाहे.

सोमठाणा परिसरात दोन तास मेघगर्जनेसह पाऊस
वाशीम : जिल्ह्यातील सोमठाणा परिसरात मंगळवारी (ता.२०) सकाळी सहा वाजेपासून अाठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. सोमठाणा परीसरात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे शेतकरी चिंतेत होते. ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसू लागला होता. हा पाऊस झाल्याने आता तूर, हरभरा, गहू या पिकांना थोडा फायदा होणार अाहे.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...